नागपूर दंगलीचं बांगलादेश कनेक्शन?

    20-Mar-2025
Total Views |
 
नागपूर दंगल
 
नागपूर : नागपूर दंगलीचं बांगलादेशशी काही कनेक्शन तर नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण पोलीस संबंधित प्रकरणाचा तपास करत आहेत. यामध्ये त्यांना बांगलादेशी काही सोशल मीडिया अकाउंट सापडले आहेत ज्याच्या माध्यमातून हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आक्षेपार्ह आणि खोट्या अफवा पोस्ट करणाऱ्या ९७ सोशल मीडिया अकाउंटची ओळख पटवण्यात आली. यापैकी बहुतेक पोस्ट बांगलादेशी आयपी अॅड्रेस असलेल्यांची माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समोर येत आहे. एका पोस्टमध्ये सोमवारची झालेली दंगल ही केवळ छोटी घटना होती आता भविष्यात याहूनही मोठी दंगल करणार, अशी देशात वादंग पेटवणारी विधाने व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहेत.
 
अशा संवेदनशील परिस्थितीत अफवा पसरवणाऱ्या आणि हिंसाचार भडकवणाऱ्या ३४ सोशल मीडिया अकाउंटवर सायबर सेलच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल आणि इतर १० एफआर दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ८४ जणांना अटक केली. ज्यात मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पक्षाचे शहराध्यक्ष फहीम शमीम खान यांचाही यामध्ये समावेश आहे. अशातच अटकेत असलेल्यांमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
 
या प्रकरणात २१ मार्चपर्यंत १९ आरोपींना पोलीस कोठडीत पाठवण्यात आले. मास्टरमाइंड फहीमवर ५०० हून अधिक दंगलखोरांना एकत्रित करत हिंसाचार भडकवल्याचा आरोप करण्यात आला आहे. गणेशपथ पोलीस ठाण्यात संबंधित प्रकरणावर एफआरआय दाखल करण्यात आला त्यानंतर काही तासांत अहीम खानच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी यशोधरा नगरमधील संजय बाग कॉलनीतील रहिवासी असलेल्या अहीम खानचा फोटो जारी केला. त्याला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत दाखल करण्यात आले. हिंसाचाराआधी खान भाषणाद्वारे भडकाऊ भाषण करत असल्याचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत.
 
 
 
१७ मार्च रोजी सायंकाळी नागपूरमध्ये हिंसक अशांतता निर्माण झाली ज्यात छत्रपती संभाजीनगरात असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यावेळी कुराणाची एका प्रत जाळल्याच्या अफवेमुळे ही दंगल झाली. यात आता ३० लोक जखमी झाले आहेत. आंदोलनादरम्यान, भलादपुर भागात मुस्लिम जामावाने एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केला आणि औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी हिंदूंवर करण्यात आलेल्या हिंसाचारात तिचे कपडे फाडण्याचे हैवानी कृत्य केले. परिस्थिती लक्षात घेता शहरात कर्फ्यू जारी करण्यात आला आहे.
 
याचपार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात झालेल्या जाळपोळीदरम्यान पोलिसांवर हल्ला केला, हल्लेखोरांना त्यांच्याच कबरीतून बाहेर काढण्यात येईल. पोलिसांवर हल्ले करणे म्हणजे अक्षम्य आहे. त्यांना कठोर शिक्षा करण्यात येईल आम्ही त्यांना सोडणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
 
अग्रलेख
जरुर वाचा