केवळ दंगलखोरांना अटक करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी धुडकावला, हिंदू संघटनांच्या आठ कार्यकर्त्यांना अटक
20-Mar-2025
Total Views |
नागपूर : नागपूर दंगलीचे पडसाद आता देशात उमटू लागले आहेत. छत्रपती संभाजीनगरात असलेल्या मुघलशासक औरंगजेबाच्या कबरीवरून हिंसाचार झाल्याचे दिसून येत आहे. अशातच आता पोलिसांनी फहीम खानसोबत इतर ५१ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. कुराणचे पान जाळल्याच्या एका अफवेमुळे निष्पाप विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे दंगलखोर कट्टरपंथींना आपल्याच लोकांना अटक करण्यात येत असल्याचा अपप्रचार केला असे म्हटले जात आहे. मात्र, पोलिसांनी कोणतीही तडजोड न करता आता हिंदूंना ताब्यात घेतले आहे.
संबंधित दंगलीच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर, आठही हिंदू कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आणि त्यानंतर न्यायालायने त्यांना हजर राहण्यास सांगितले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर, आठही हिंदू कार्यकर्त्यांनी पोलिसांना सरेंडर झाले आहेत. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. यानंतर आता सर्वांना तिथून ३००० च्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला. अमोल ठाकरे लखन कुरेल, मुकेश बारपोत्रे, सुशील चौरासिया आणि ऋषभ अर्खेल, रामचरण दुबे, कमल हरियाणी अशी त्यांची नावे आहेत.
त्यांचे वकील संजय बालपोडे म्हणाले की, सर्व कार्यकर्त्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्याचे कारणही समोर आले आहे, कारण लोकांमध्ये असा समज होता की, पोलीस एकतर्फी कारवाई करत आहेत आणि आरोपींना अटक करण्यात काटकसर करताना दिसत आहेत आणि त्यांना आता न्यायालयात हजर करण्यात आले. परवानगी घेतल्यानंतर त्यांनी निषेध केला पण त्यानंतर हिंसाचार उफळला आहे.
#WATCH | Nagpur, Maharashtra | Eight workers of VHP and Bajrang Dal surrendered before Kotwali police. Police arrested them and produced them before the court.
Maharashtra police in Nagpur has registered FIRs against office-bearers of the Vishwa Hindu Parishad (VHP) and Bajrang… pic.twitter.com/1ifgl5T3io
संभाजीनगरमधील मुघल सम्राट औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी निदर्शने करताना धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली नागपूरमधील महाराष्ट्र पोलिसांनी विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केले आहेत.