बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

    20-Mar-2025
Total Views | 14
 
Bihar
 
पाटणा (Bihar) : बिहारमधील भगलापूमधून मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्या पुतण्यावर गोळीबार करत हत्या करण्यात आल्याची दुर्देवी घटना घडली आहे. पाण्यावरून झालेल्या वादातून दोन भावांनी गोळीबार केला असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यात एका भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुसरा भाऊ आणि त्याच्या आईलाही गोळ्या लागल्याने जखमी झाल्याचे वृत्त आहे. नवगछियामधील परबट्टा पोलीस ठाणेअंतर्गत गजगतपूर गावात ही घटना घडली आहे. मृत आणि जखमी ही नित्यानंद यांच्या चुलत भावाची मुलं आहेत.
 
संबंधित प्रकरणात स्थानिक सूत्रांकडून माहिती समोर आली आहे की, केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांचे दोन पुतणे जयजीत यादव आणि विश्वजीत यादव यांच्यात किरकोळ वादातून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोघे भाऊ आणि त्यांच्या आईला गोळी लागल्याने हे तिघेही गोळीबारामुळे जखमी झाले आहेत. तसेच संबंधित वादाचे निराकारण करण्यासाठी आईने मध्यस्थी केली. मात्र, त्यादरम्यान गोळीबार झाला आणि त्यात त्याच्या आईलाही गोळी लागली. या गोळीबारात विश्वजीत यादवचा मृत्यू झाला असून त्यांना एका भागलपूरमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्याच्या आईच्या हातात गोळी लागली होती.
 
 
 
या प्रकरणात मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, गुरुवारी पहाटे पाणीपुरवठा करणाऱ्या नळातून पाणी भरण्यावरून दोन्ही भावांमध्ये वादाला तोंड फुटले आणि त्यांच्यात किरकोळ वादातून गोळीबार झाला. सुमारे चार ते पाच राऊंड गोळीबार केल्यानंतर विश्वजीत यादव हे पाणी भरत होते. त्यावेळी जयजीत यादवने विरोध केला. त्यावेळी तो म्हणाला की, नळ आमचा आहे आणि आम्ही पाणी भरून देणार नाही. या किरकोळ वादावरून दोघांमध्ये वादाला तोंड फुटले. दरम्यान, या प्रकरणात विश्वजीत यादवने गोळीबार केला, त्यानंतर त्याचे परिणाम होत्याचे नव्हते झाल्याचे दिसून आले.
 
यानंतर विश्वजीतकडून पिस्तूल घेण्यात आले आणि तेच पिस्तूल जयजीतने खेचून घेतले आणि विश्वजीतवर गोळीबार केला. त्यानंतर त्यांना भागलपूरमधील डॉ. एन. के. यादव रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी विश्वजीतला मृत घोषित केले. तर जयजीत यादववर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित प्रकरणात आता पोलिसांनी लक्ष्य घातले आहे, दरम्यान, जयजीत यादववर याआधी अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. दोघांमधील वाद अनेक वर्षांपासून असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा