मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले
20-Mar-2025
Total Views | 18
जयपूर : उत्तर प्रदेशातील मेरठनंतर विवाहबाह्य संबंध (Extramarital Affairs) ठेवणारी काळीज हेलावून टाकणाऱ्या धक्कादायक घटनेनंतर जयपूरमध्ये पती -पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना समोर आली आहे. जयपूरमध्ये एका महिलेचे प्रेमसंबंध असलेल्या परपुरूषाला तिच्या पतीचा खून केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर तिने आपल्या पतीचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी सांगितले की, भाजी विक्रेता धन्नलाल सैनी याला त्याच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाल्यानंतर तिने प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीला जाळलं आहे.
मृताची पत्नी गोपाली देवी यांचे गेल्या पाच वर्षांपासून कपड्यांच्या दुकानात काम करणाऱ्या एका परपुरूषाशी प्रेमसंबंध होते. धन्नालालला पत्नीच्या प्रेमसंबंधाची माहिती आलीकडेच कानावर आली. १५ मार्च रोजी, धन्नालाल त्याची पत्नी न सापडल्याने, सागानेरच्या काशिदो वाली गलीमध्ये दीनदयाळच्या दुकानात गेला होता. त्यावेळी गोपाली देवी त्याला दीनदयाळसोबत काम करताना दिसली होती.
⚠️Trigger Warning : Sensitive Visual⚠️
जयपुर में गोपाली देवी ने बॉयफ्रेंड दीनदयाल संग मिलकर अपने पति धन्नालाल सैनी की गला दबाकर हत्या कर दी। फिर लाश बोरे में पैक की और जंगल में ले जाकर जला दी।
त्यावेळी पती-पत्नी जोडप्यात जोरदार वादंग निर्माण झाला. त्यानंतर गोपाली देवी आणि दीनदयाळ याने तिच्या पतीला मारण्याचा कट रचला होता. दोघांनी मिळून धन्नालालला दुकानात बोलावले. त्यानंतर धन्नालालचा दोरीने गळा आवळला आणि त्याला जीवे मारण्यात आले. त्यावेळी गोपाली देवा आणि दीनदयाळने मृतदेहा एका पिशवीत भरला आणि दीनदयाळच्या दुचाकीवरून भेरूजी मंदिराजवळ एका निर्जनस्थळी नेण्यात आला. धन्नलालची ओळख लपवण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी संबंधत मृतदेह जाळून टाकला आहे.
यानंतर आता महिलेने आणि प्रियकराने जयपूरहून पळून जाण्याचा कट रचला. अशातच आता पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दरम्यान, अशीच एक घटना काल परवा उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडली होती. पती सौरव हा आपल्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मेरठला सुट्टीवरून घरी परतला होता. मात्र, यावेळी पत्नी मुस्कानने आपल्या प्रियकराच्या मदतीने त्याला संपवले. त्याच्या शरीराचे तुकडे करून तो मृतदेह एका ड्रममध्ये टाकण्यात आला होता. यावेळी घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मुस्कानच्या आई- वडिलांनी आपल्या लेकीची म्हणजेच मुस्कानची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.