पंजाबच्या मोहालीत हिमाचल रोडवरील अवजड वाहतूक बसवर हल्ला, ओळख लपवण्यासाठी हल्लेखोरांनी वाहनाच्या नंबरप्लेटवर लावली टेप
19-Mar-2025
Total Views | 10
Photo Credit : Amar Ujala
चंदीगड : पंजाबमधील मोहालीच्या खरार हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या एका बसवर हल्ला (Bus Attack) करण्यात आला.ही हल्ला मंगळवारी ६.३० च्या सुमारास झाला असल्याची घटना घडली आहे. हिमाचल प्रदेशातील हमीरपूर डेपोच्या बसवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करत बसची तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. संबंधित बस चंदीगडहून हिमाचलमधील हमीपूरला जात होती. रोडवेज बस चंदीगडच्या सेक्टर ४३ येथील आयएसबीटीतून निघाली होती. बसने नुकतेच १० किमी अंतर कापले होते. खरारजवळ अज्ञात हल्लेखोरांनी बसवर हल्ला केला.
खरारजवल, कारमधून आलेल्या दोन हल्लेखोरांनी बसवर काठ्यांनी हल्ला केला. तथापि, बसमधील चालक, वाहक आणि प्रवाशांनी कसेबसे स्वत:ला वाचवले. त्यानंतर सुदैवाने बसमधील प्रवाशांना कोणतीही इजा झाली नव्हती. या घटनेनंतर बसमधील प्रवासी घाबरले असून बसच्या काचाही फोडण्यात आल्या होत्या. त्यावेली हल्लेखोरांनी बसवर काठ्यांनी हल्ला केला आणि तिच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. पोलिसांनी या प्रकरणी आता गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
खरड़,पंजाब में HRTC बस पर हमला कितना खतरनाक हुआ है वो अंदाजा आप इस वीडियो को देख लग सकते हैं।।
पंजाब से अब जो कुछ किया जा रहा है वो साफ दर्शाता है ये हालात सुधारने की जगह बिगाड़ना चाहते हैं। निवेदन है हिमाचल सरकार से सख्त कदम उठाए देर होने से पहले ड्राईवर कंडक्टर सवारियों की… pic.twitter.com/7cFl9ytjiy
बस चालक रवी कुमार आणि बस कंडक्टर लवली कुमार यांनी सांगितले की, ते संध्याकाळी ६. वाजता चंदीगडहून हमीरपूरला निघाले होते, खरार बसस्थानकावरून प्रवाशांना घेऊन उड्डाणपुलावर दाखल झाले होते. तिथे या पूर्वीच अल्टो नावाचे एक चार चाकी वाहन उभे होते. त्यामध्ये दोघेजण चेहऱ्याला मास्क परिधान केलेले तरुण एका गाडीच्या बाहेर उभे होते. तर दुसरी व्यक्ती गाडीच्या सीटवर बसला होता. बाहेर उभ्या असणाऱ्या एका तरुणाने बस चालकाला थांबण्याचा इशारा केला आणि बस थांबताच त्याने त्याच्याकडे असणाऱ्या काठीने बसच्या दोन्ही पुढच्या काचा फोडल्या आहेत. यानंतर, दोन्ही तरुण हे गाडीत बसले होते आणि कुरळीच्या दिशेने पळून गेले.
हल्लेखोरांच्या गाडीच्या नंबर प्लेटवर टेप लावण्यात आली होती. जेणेकरून हल्लेखोरांच्या वाहनाच्या गाडीची ओळख लपून रहावी असा त्यामागील हेतू होता. बस चालक आणि वाहन चालकाने घटनेची तक्रार खरार शहर पोलीस ठाण्यात केली आणि प्रवासांना दुसऱ्या बसने पुढे पाठवण्यात आले. घटनेची माहिती मिळवताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अपघातग्रस्तांना बस घटनास्थळावरून बाजूला करत ताब्यात घेण्यात आली होती. संबंधित प्रकरणाचा आता पोलीस तपास करत आहेत.