"तुझ्या फिल्म्स फ्लॉप, माझे चित्रपट हिट", कार्तिक आर्यन आणि करण जोहरचा ‘रॅप वॉर’ सोशल मीडियावर चर्चेत!

    18-Mar-2025
Total Views | 7
 
 
kartik aaryan and karan johars rap war is the talk of social media
 
 
 
मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या एका अनोख्या गोष्टीची जोरदार चर्चा आहे. अभिनेता कार्तिक आर्यन आणि निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांच्यातील रॅप वॉर एका मोठ्या कार्यक्रमादरम्यान दोघांनी स्टेजवर एकमेकांना रॅपमधून टोले हाणले, आणि त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
 
 
काय आहे प्रकरण?
'आयफा २०२५' पुरस्कार सोहळ्यात हा अनोखा क्षण घडला. कार्तिक आणि करण हे एकेकाळचे प्रतिस्पर्धी होते. ‘दोस्ताना २’ प्रकरणामुळे त्यांच्यात दुरावा आला होता, पण आता ‘तू मेरी मैं तेरा’ या चित्रपटाच्या निमित्ताने ते पुन्हा एकत्र आले आहेत. मात्र, यावेळी चर्चेत आहे ते त्यांच्या दोघांमधील रॅप युद्ध!
 
 
रॅपमधील जोरदार पंचलाईन
करण जोहरने आपल्या रॅपमध्ये कार्तिकवर निशाणा साधताना म्हटले,
"तू आहेस न्यू कमर, मी आहे इंडस्ट्रीचा किंग,
मी दिले सुपरस्टार, माझे खेळ आहेत बिग!
तू हिरो आजचा, पण फ्रँचायजी चोरली,
तुझी मेहनत भारी, पण खान-कपूर स्टोरी सोडली!"
 
 
यावर कार्तिक आर्यनही शांत बसला नाही. त्याने उत्तर दिले,
"तू घराणेशाहीचा राजा, मी मेहनतीचा बादशाह,
तुझ्या फिल्म्स फ्लॉप, माझे चित्रपट हिट झाले बघ ना!
‘स्टुडंट ऑफ द इयर २’ कोसळले बॉक्स ऑफिसवर,
‘भूल भुलैया ३’ ने दिला मी धडाका भरपूर!"
 
 
सोशल मीडियावर जोरदार चर्चा
हा रॅप वॉर पाहून उपस्थित प्रेक्षकांमध्ये उत्साह संचारला. दोघांचेही चाहते यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींना हे मनोरंजन वाटले, तर काहींनी याला गमतीशीर टोमणे समजले. या दोघांमधील संबंध नेमके कसे आहेत, हे सांगणे कठीण आहे. हा रॅप केवळ एक मजेदार अॅक्ट होता, की त्यातून कोणते संकेत द्यायचे होते, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, या प्रकारामुळे बॉलिवूडमध्ये नवा रंगतदार चर्चेचा विषय निर्माण झाला आहे!
 
 
कार्तिक आर्यनच्या आगामी योजना
कार्तिक आर्यन लवकरच ‘आशिकी ३’ मध्ये दिसणार आहे. त्याच्या ‘चंदू चॅम्पियन’ आणि ‘भूल भुलैया ३’ या चित्रपटांनी चांगली कमाई केली, त्यामुळे त्याच्या आगामी चित्रपटाकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत.
 
अग्रलेख
जरुर वाचा