'मिशन १०० दिवस' उपक्रमात अंतिम फेरीत अव्वल येण्याचे लक्ष्य

ठाणे महापालिका आयुक्तांनी कंबर कसली

    18-Mar-2025
Total Views | 6

Thane Municipal Corporation come on top in the final round of the  
 
 
ठाणे: ( Thane Municipal Corporation come on top in the final round of the 'Mission 100 Days' initiative ) 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतुन आकाराला आलेल्या ‘मिशन १०० दिवस’ या उपक्रमाच्या प्राथमिक मूल्यमापन फेरीत ठाणे महापालिकेला पहिला क्रमांक मिळाला. आता पुढील महिन्यात अंतिम मुल्यमापन फेरी होणार असल्याने पुन्हा अव्वल राहण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह प्रशासनाने कंबर कसली आहे.
 
मिशन १०० दिवस उपक्रमाच्या प्राथमिक मूल्यांकनातील अव्वल कामगिरीमुळे ठाणे महापालिकेवरील जबाबदारी आणखी वाढली आहे. अंतिम मूल्यमापन १७ एप्रिल ते २८ एप्रिल या काळात होणार आहे. त्यादृष्टीने आयोजित सर्व विभागप्रमुखाच्या बैठकीत आयुक्त राव यांनी प्रशासनाचे मनोबल वाढवून अंतिम फेरीसाठी सज्जतेचे निर्देश दिले. महापालिकेकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांबद्दल नागरिकांचा दृष्टिकोन अधिकाधिक सकारात्मक होईल या दृष्टीने सर्व विभागांनी काम करावे.
 
नागरिकांच्या कामाला लागणाऱ्या वेळेत बचत होईल यादृष्टीने नियोजन करण्याच्या सुचना देऊन आयुक्त सौरभ राव यांनी संकेतस्थळ, सुकर जीवनमान, स्वच्छता, नागरी तक्रार निवारण, कार्यालयीन सोयीसुविधा, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी, ई ऑफिस प्रणाली, उद्योगांना गुंतवणुकीस प्रोत्साहन, प्रशिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि नाविन्यपूर्ण उपक्रम या गोष्टींवर महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांनी लक्ष द्यावे. तसेच, या मूल्यांकनाचे जास्तीत जास्त गुण आपल्याला मिळतील या दृष्टीने कार्यवाही करावी, असेही आयुक्त राव यांनी या बैठकीत स्पष्ट केले.
 
कचराकोंडीमुळे शहर स्वच्छतेचे आव्हान
 
शहरात कचराकोंडी वाढली असल्याने कचरा आणि शहर स्वच्छतेचे आव्हान पालिकेसमोर असुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कचरा हलवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने वागळे इस्टेट येथील सी पी तलाव येथे साठलेल्या कचऱ्याचे आतकोली येथे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. त्यामुळे शहरातील कचरा संकलनही नियमित होईल. असा विश्वास आयुक्त राव यांनी व्यक्त केला. या बैठकीत, विविध विभागांच्या महसुलाच्या वसुलीचा आढावा घेत मार्चअखेर पर्यंत सर्व विभागांनी त्यांच्या वसुलीचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करावे, असेही आयुक्त राव म्हणाले.
 
अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई
 
अनधिकृत बांधकामांविषयी महापालिकेची भूमिका स्पष्ट असून राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या नियमावलीच्या आधारे सर्व सहाय्यक आयुक्तांनी अनधिकृत बांधकामे अतिक्रमणे यांच्या विरोधात काटेकोर कारवाई करावी, असेही आयुक्त राव यांनी सांगितले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा