कौशल्य विभाग पुरवणार नवी मुंबई विमानतळाला कुशल मनुष्यबळ

    18-Mar-2025
Total Views | 8
 
Skill Department to provide skilled manpower to Navi Mumbai Airport Mangal Prabhat Lodha
 
मुंबई : ( Skill Department to provide skilled manpower to Navi Mumbai Airport Mangal Prabhat Lodha ) नवी मुंबई विमानतळाकरिता कुशल मनुष्यबळासाठी कौशल्य विभाग प्रशिक्षण देणार आहे. ‘सिडको’ आणि कौशल्य विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जाणार आहे. यानिमित्त हजारो प्रकल्पग्रस्तांना विमानतळ सेवा क्षेत्रात नोकरीची संधी मिळणार आहे. कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात प्रकल्पग्रस्तांसाठी विमानतळाशी सबंधित लवकरच प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होणार आहे.
 
‘सिडको’ निर्माण करत असलेल्या नवी मुंबई विमानतळासाठी या परिसरात काही गावांची जमीन संपादित करण्यात आली आहे. या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या अनुषंगाने तिथल्या इच्छुक प्रकल्पग्रस्तांसाठी विमानतळाशी संबंधित व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासंदर्भात प्रस्ताव ‘सिडको’ने कौशल्य, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाला सादर केला होता. या प्रस्तावाला कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी तातडीने मान्यता देऊन कार्यवाहीला सुरुवात केली. त्यानुसार इच्छुक प्रकल्पग्रस्तांना विमानतळाशी संबंधित व्यावसायिक प्रशिक्षण लवकरच सुरू होणार असल्याची माहिती कौशल्य विकास विभागाने दिली.
 
प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणार्‍या प्रशिक्षण कार्यक्रमात अनुक्रमे एअरलाईन बॅगेज हॅण्डलर, एअरपोर्ट टर्मिनल ऑपरेशन्स, एअरपोर्ट कार्गो ऑपरेशन्स, कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह आणि एअरलाईन ग्राऊंड स्टाफ अर्थात विमानतळ सेवाक्षेत्राशी संबंधित अशा पाच व्यावसायिक अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे. पहिल्या टप्प्यात 1 हजार, 191 प्रकल्पग्रस्तांनी यात नोंदणी केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महास्वयम’ संकेतस्थळावर आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यावर केंद्राच्या कौशल्य विकास निकषानुसार प्रत्यक्ष प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे.
 
सामाजिक दायित्वाला प्राधान्य
 
व्यावसायिक, औद्योगिक प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास विभागाने राज्यातल्या लाखो तरुणांना रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. ‘सामाजिक दायित्व’ हा या विभागाच्या कार्याचा महत्त्वाचा घटक आहे. जागतिक नकाशावर नवी मुंबई हे शहर लवकरच आपला ठसा उमटवणार असून यात कौशल्य विकास विभागाचे ही मोठे योगदान असेल, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
 
- मंगल प्रभात लोढा, कौशल्य विकासमंत्री
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
जर्मनीमध्ये विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये होणार रोजगाराच्या संधी उपलब्ध: मंगल प्रभात लोढा

जर्मनीमध्ये विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये होणार रोजगाराच्या संधी उपलब्ध: मंगल प्रभात लोढा

Mangal Prabhat Lodha राज्य शासनाने कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग राज्यासोबत करार केला आहे.या करारानुसार बाडेन वुटेनबर्ग येथे विविध प्रकारच्या क्षेत्रांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग येथील शिक्षण क्षेत्रातील तज्ञ शिष्टमंडळ दि.१६ ते २२ मार्च या कालावधीत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून यादरम्यान ते विविध व्यावसायिक आणि औद्योगिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना भेटी देत आहेत. या भेटीदरम्यान राज्यात विविध संस्थांमध्ये सुरु असलेले कौशल्य प्रशिक्षण आणि जर्मनीत ..

हरिद्वार येथे अखिल भारतीय शास्त्र स्पर्धेला सुरुवात

हरिद्वार येथे अखिल भारतीय शास्त्र स्पर्धेला सुरुवात

केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली आणि पतंजली विद्यापीठ, हरिद्वार यांच्या संयुक्त विद्यमाने ६२ वी अखिल भारतीय शास्त्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दि. १८ ते २१ मार्च दरम्यान हरिद्वार येथे होत असलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सत्रात पतंजली विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य बाळकृष्ण यांनी सभागृहात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले, संस्कृत ही केवळ प्राचीन भाषा नसून ती अध्यात्म, विज्ञान आणि संस्कृतीचा अद्भुत संगम आहे. संस्कृत ही आपली मूळ भाषा आहे, जी सत्यतेवर आधारित आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमा..

पत्नीने आंधळ्यासारखं प्रेम करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला खून! ड्रममध्ये ठेवण्यात आला मृतदेह, पत्नीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात केली तक्रार

पत्नीने आंधळ्यासारखं प्रेम करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला खून! ड्रममध्ये ठेवण्यात आला मृतदेह, पत्नीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात केली तक्रार

Saurav Murder उत्तर प्रदेशातील मेरठमधील ब्रह्मपुरी पोलीस ठाणे परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. ज्यात एका पत्नीने तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेह घरातील एका मोठ्या ड्रममध्ये ठेवण्यात आला आणि त्यावरील असणारे लोखंडी झाकण सिमेंटचा लेप देऊन बंद करण्यात आले. कोणालाही कसलाही संशय येऊ नये म्हणून, पत्नी तिच्या पतीच्या मोबाईलवरून त्याच्या जवळच्या लोकांना सतत मेसेज आणि कॉल करत. या संबंधीत घटनेची माहिती पोलिसांनी घटनास्थळी जाखल झाले होते. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनास..