दापोली, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईत उबाठा गटाला खिंडार! अनेक बडे नेते शिवसेनेत दाखल
18-Mar-2025
Total Views | 35
मुंबई : दापोली, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईतील उबाठा गटाच्या अनेक बड्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंगळवार, १८ मार्च रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुक्तगिरी बंगल्यावर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
दापोलीतील उबाठा गटातील संजय कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर छत्रपती संभाजीनगर येथील माजी आमदार आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, माजी नगराध्यक्ष साबीर भाई खान, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिनकर बापू पवार, मा. जि. प. सदस्य बादशाह पटेल, मा. पं. स. सभापती राजूनाना मगर यांच्यासह इतर सर्व लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी आणि डॉ. राजू डोंगरे, राम हरी जाधवे, बाबासाहेब जगताप इत्यादी नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
यासोबतच यावेळी मुंबईतीलसुद्धा अनेक पक्षप्रवेश झालेत. भांडुप येथील माजी नगरसेवक उमेश पाटील, चेंबूर येथील माजी नगरसेविका अंजली नाईक, गोरेगाव येथील माजी नगरसेविका लोचना चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी, शाखाप्रमुख, उपशाखप्रमुख, महिला सेना आणि शिवसैनिक शिवसेनेत दाखल झाले.