पिंपरी : ( Shiv Jayanti celebrated with at IIMS ) दिनांक १८ मार्च २०२५ : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस ) मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन आपली सर्वोत्कृष्ठ कामगिरी करण्याचे ध्येय बाळगावे असे आवाहन संस्थेचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी यावेळी केले. शिवजयंती उत्सवानिमित्त विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पारंपारिक वेशभूषा परिधान केली होती.
त्याआधी आठवडाभर आयआयएमएसच्या विद्यार्थ्यांनी गँग डे, हॅलोविन डे, बॉलिवूड बाझीगर डे,मिस मॅच डे, चोको लोको डे, स्कुल स्नॅक्स डे, मिम डे, ट्रॅडिशनल डे अशा विविध कल्पनांवर आधारित दिवस मोठ्या उत्साहात साजरे केले. चित्रपटातील कलाकारांच्या वेशभूषा, पारंपारिक व पाश्चिमात्य मिश्र वेशभूषा तसेच शालेय गणवेष परिधान करून विद्यार्थ्यानी धमाल केली.
विविध संकल्पनांवर आधारित डे मधील उत्कृष्ट वेशभूषा केलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना बक्षीसे प्रदान करण्यात आली. संस्थेतील एमबीए, एमसीए, बीबीए व बीसीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साही सहभाग नोंदवला.