नवीन सिमकार्ड घेणाऱ्यांसह फारबर कनेक्शन धारकांनाही मिळणार सुविधा
18-Mar-2025
Total Views | 5
मुंबई : यंदाचा आयपीएलचा मोसम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना, जिओकडून आपल्या ग्राहकांसाठी एक खूशखबर देण्यात आली आहे. जिओ धारकांना हा आयपीएलचा मोसम मोफत बघता येणार आहे. रु. २९९ किंवा त्याहून अधिक प्लॅनसह नवीन जिओ सिम कनेक्शन घेतल्यास किंवा किमान रु. २९९ चा रिचार्ज केल्यास जिओ ग्राहक जिओहॉटस्टारवर मोफत आयपीएल क्रिकेट सीझनचा आनंद घेऊ शकतात.
या अनलिमिटेड क्रिकेट ऑफरमध्ये ग्राहकांना टीव्ही किंवा मोबाईलवर ९० दिवसांसाठी मोफत जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शन मिळेल, तेही फोर के क्वालिटीमध्ये. म्हणजेच, २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल क्रिकेट सीझनचा मोफत आनंद घेता येईल. जिओहॉटस्टार पॅक २२ मार्च २०२५ पासून पुढील ९० दिवसांसाठी वैध असेल.
याशिवाय, जिओ घरांसाठी जिओफायबर किंवा जिओएअरफायबरचे मोफत ट्रायल कनेक्शन देखील देणार आहे. अल्ट्रा-फास्ट इंटरनेटचे हे ट्रायल कनेक्शन ५० दिवसांपर्यंत मोफत उपलब्ध असेल. यामुळे ग्राहकांना फोर के मध्ये क्रिकेट पाहण्याचा अप्रतिम अनुभव आणि शानदार होम एंटरटेनमेंट मिळेल. जिओफायबर किंवा जिओएअरफायबरच्या मोफत ट्रायल कनेक्शनमध्ये ८००पेक्षा जास्त टीव्ही चॅनेल, ११पेक्षा जास्त ओटीटी अॅप्स आणि अनलिमिटेड वायफाय मिळेल.
ही ऑफर १७ मार्च ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत उपलब्ध असेल. ऑफरचा लाभ घेण्यासाठी विद्यमान जिओ सिम वापरकर्त्यांना किमान रु. २९९ चे रिचार्ज करावे लागेल. तसेच नवीन जिओ सिम ग्राहकांना रु. २९९ किंवा त्याहून अधिक प्लॅनसह नवीन जिओ सिम घ्यावे लागेल. ज्यांनी १७ मार्चपूर्वी रिचार्ज केले असेल, ते रु १०० च्या अॅड-ऑन पॅकमधून या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.