जिहादी कारवायांना उघडपणे समर्थन; 'या' प्रसिद्ध चॅनलवर होणार कारवाई

    18-Mar-2025   
Total Views | 41

British Jihadi News Channel News

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (British Jihadi News Channel)
ब्रिटनचे प्रसिद्ध असलेले 'इस्लाम चॅनल' जे स्वतःला इस्लामिक समुदायाचा आवाज म्हणवतात, ते चॅनल आता प्रचंड अडचणीत सापडले आहे. दररोज २० लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा दावा करणारी ही वाहिनी ब्रिटन सरकारच्या ऑफकॉम म्हणजेच ऑफिस ऑफ कम्युनिकेशन्स या सरकारी संस्थेच्या रडारवर आली आहे. इस्लाम चॅनलवर हिंसक इस्लामिक चळवळींचे कौतुक करणे, पाश्चात्य देशांविरुद्ध द्वेष भडकावणे आणि जिहादी कारणांसाठी सहानुभूती व समर्थन दाखवल्याचा आरोप आहे.

हे वाचलंत का? : जिओच्या ग्राहकांना खूशखबर, जिओ हॉटस्टारवर बघा मोफत आयपीएल

'द टेलिग्राफ'च्या वृत्तानुसार, चॅनलचा दावा आहे की दररोज २० लाख लोक चॅनल पाहतात आणि ब्रिटनमधील ६० टक्के मुस्लिम त्याचे फॉलोअर्स आहेत. मात्र चॅनलवर आता निःपक्षपातीपणाचे नियम मोडून अतिरेक्यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या इस्रायलवर हमासच्या हल्ल्याचे इस्लाम चॅनेलने कौतुक केले आणि इस्रायलची तुलना नाझींशी केली असा अहवाल ऑफकॉमला मिळाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती आहे. इस्लाम चॅनलने अतिरेक्यांना व्यासपीठ दिले, राजकीय कव्हरेजमध्ये निष्पक्षता ठेवली नाही आणि आवश्यक तथ्यांबद्दल दर्शकांची दिशाभूल केली असा आरोपही अहवालात करण्यात आला आहे.


Islam Channel News

जिहादी गटांना समर्थन देण्याचा आरोप
अहवालानुसार, ऑक्सफर्ड इंस्टिट्यूट फॉर ब्रिटिश इस्लामचे संचालक डॉ. ताज हरगई यांनी ही तक्रार ऑफकॉमला दिली आहे. डॉ. हरगई यांना ब्रिटिश इस्लाममध्ये उदारमतवादी विचारवंत मानले जाते. त्यांच्या अहवालात नोव्हेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत इस्लाम चॅनलने प्रसारणाचे नियम सातत्याने मोडले, असल्याचे सांगितले आहे.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
अग्रलेख
जरुर वाचा
भारतीय गणिती परंपरा आणि पाश्चात्त्यांना ज्ञानपरंपरेचे वावडे

भारतीय गणिती परंपरा आणि पाश्चात्त्यांना ज्ञानपरंपरेचे वावडे

आज गणितातील प्रमेये, सिद्धांत हे पाश्चात्त्य गणिततज्ज्ञांच्या नावे असले, तरी भारतीय गणिती परंपरा ही ज्ञानसमृद्ध आणि काळाच्या पलीकडचा विचार करणारी होती. परंतु, दुर्दैवाने वसाहतवाद आणि युरोपीय वंशश्रेष्ठत्वाच्या सिद्धांतामुळे प्राचीन भारतीय गणिती परंपरा पद्धतशीरपणे दुर्लक्षित केल्यामुळे ती काहीशी अडगळीत पडली. पण, आज सर्वच क्षेत्रांत भारतीय ज्ञानपरंपरेचे पुनर्जागरण होत असताना, गणिती परंपरेचा समृद्ध वारसाही प्रत्येक भारतीयाने जाणून घेणे, त्याचा प्रचार-प्रसार करणे, हे देखील तितकेच महत्त्वाचे. तेव्हा, भारतीय ..

नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

दिवस होता सोमवार. रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील काही भागात अचानक हिंसाचार उसळला. दोन गटात हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ या सगळ्या घटनांनी नागपूर हादरलं. एवढंच नाही तर जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तरीसुद्धा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशीरापर्यंत जमाव पांगवत हा हिंसाचार शांत केला. मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे कायम वर्दळ असलेल्या महाल परिसरात. सध्या नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आलीये. मात्र, या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली? ..