अखेर पक्षप्रवेशाची तारीख ठरली! सूनेसह काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्याच्या हाती घड्याळ

    17-Mar-2025
Total Views | 25

ex congress mp bhaskarrao khatgaonkar patil will join ncp ajit pawar
 
 
नांदेड : (Bhaskarrao Khatgaonkar Patil) माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि मीनल खतगावकर (Meenal Khatgaonkar)काँग्रेसला रामराम ठोकून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. यामुळे राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या दोघांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला असून येत्या २३ मार्च रोजी नरसी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. भास्करराव पाटील खतगावकर हे माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण यांचे मेहुणे आहेत.
 
भास्करराव यांच्या सून मीनल खतगावकर यांनी नायगाव मतदारसंघामधून काँग्रेसच्या तिकिटावर २०२४ ची विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र भाजपचे राजेश पवार यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर सूनेच्या राजकीय भविष्यासाठी पुन्हा भास्करराव पाटील खतगावकर यांनी आता राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, "आताच्या काँग्रेसच्या नेतेमंडळीना लोकांच्या प्रश्नांची जाण नाही, या भागाचा विकास करायचा असेल तर काँग्रेस सोडणे गरजेचे आहे", अशी प्रतिक्रिया खतगावकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
 
दरम्यान या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून हा पक्षप्रवेश होणार आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता, त्यानंतर आता हा आणखी एक मोठा झटका काँग्रेसला बसणार आहे. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि मीनल खतगावकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा

दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा 'अशी ही जमवा जमवी' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित; 'या' तारखेला पाहायला मिळणार चित्रपट! जाणून घ्या

मैत्री, प्रेम, कुटुंब या विषयांवर आजवर बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत; मात्र राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत, लोकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित 'अशी ही जमवा जमवी' या चित्रपटात फक्त तरुणांचीच नाही तर वृद्ध मित्र मैत्रिणींचीसुद्धा एक धमाकेदार कहाणी आपल्याला अनुभवयाला मिळणार आहे. या दमदार आणि बहुप्रतीक्षित चित्रपटाचं टिझर प्रदर्शित झालंय, ज्यात अशोक सराफ आणि वंदना गुप्ते या दोन दिग्गजांची मजेदार जुगलबंदी पहायला मिळते. चित्रपटाचं नाव आणि रिलीझ झालेल्या टिझरवरून संपूर्ण सिनेमा पाहण्याची प्रेक्षकांची ..