अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिराचे बांधकाम लवकरच पूर्ण होणार

    17-Mar-2025
Total Views |
 
Shri Ram temple
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील प्रभू श्रीराम यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर हे जून २०२५ पर्यंत पूर्ण होईल. राम मंदिर हिंदू समाजाच्या सहकाऱ्याने बांधले गेले आहे. यात सरकारकडून कोणतीही मदत घेण्यात आलेली नाही, असे असून मंदिराने सरकारकडे शेकडो कोटींचा कर जमा केलेला आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या एका बैठकीत सरचिटणीस चंपत राय यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मंदिर बांधकामाचे ९६ टक्के काम पूर्ण झाले आहे. संबंधित मंदिराचे बांधकाम जून २०२५ पर्यंत पूर्ण होईल. मंदिराच्या भिंतीचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. आता उर्वरित मंदिराचे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
 
मंदिराच्या बांधकामासाठी आतापर्यंत २१५० कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती चंपत राय यांनी दिली. हे पैसे हिंदूंनी आणि भक्तांनी जमा केले आहेत. रामजन्मभूमी ट्रस्टसाठी आगामी खर्चही याच खर्चाच्या निधीतून होणार आहे. राम मंदिराच्या बांधकामासाठी हिंदूंनी ३५०० कोटींहून अधिक देणगी दिली आहे.
 
मंदिराच्या बांधकामासाठी राज्य तसेच केंद्र सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत घेण्यात आलेली नाही. राम मंदिराच्या परिसरात सरकारी संस्थांकडून केले जाणारे बांधकामही मंदिर ट्रस्टकडून निधीद्वारे केले जात आहे.
 
हिशोब सादर करताना ट्रस्टने सांगितले की, त्यांनी सरकारला जीएसटी म्हणून २७२ कोटी रुपये दिले. ३९ कोटी रुपये सरकारी खात्यात जामा करण्यात आले आणि १४.९ कोटी रुपये रॉयल्टीवर खर्च करण्यात आला. कामगार निधी म्हणून कामगारांना ७.४ कोटी रुपये दिले गेले तसेच विमा पॉलिसींसाठी ४ कोटी रुपये देण्यात आले. 
 
मंदिराच्या परिसरात रामकथा, संग्रहालय, विश्रामगृह आणि तीन प्रवेशद्वार बांधण्यासाठी ट्रस्टने उत्तर प्रदेश बांधकाम मंडळाला २०० कोटी रुपये दिले आहेत. राम मंदिराच्या बांधकामामुळे हिंदूंची शतकानुशतके चाललेली प्रतीक्षा पूर्ण झाली. 
 
तसेच राम मंदिराच्या ट्रस्टच्या सरचिटणीस चंपत राय यांच्या मते, जीएसटीपासून ते स्टॅम्प ड्युटीपर्यंतचा सर्व खर्च देणगी आणि राम भक्ताच्या माध्यमातून देण्यात आला आहे. त्यानंतर चंपत रॉय यांनी माहिती दिली की, विविध राज्यांना रॉयल्टी म्हणून २७२ कोटी, जीएसटी, ३९ कोटी टीडीएस, नकाशा मंजुरीसाठी अयोध्या विकास प्राधिकरणाला ५ कोटी, जमीन खरेदीवर २९ कोटी स्टॅम्प ड्युटी, १४ कोटी कामगारांची उपकरणे. ७.४ कोटी ईएसआयसी, ४ कोटी विमा, १० कोटी वीज बिल आणि १४.९ कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. रामभक्तही देणगी देत असून भक्तांनी राम मंदिराला ९४४ किलो चांदी दान केली आहे.