...तर पाकिस्तान आणि बांग्लादेशात 'ती' घाण घेऊन जावी! मंत्री नितेश राणेंचा घणाघात
17-Mar-2025
Total Views | 15
पुणे : ज्यांना औरंगजेबाच्या कबरीची घाण हवी आहे त्यांनी ती पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये घेऊन जावी, असा घणाघात मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. सोमवार, १७ मार्च रोजी किल्ले शिवनेरी गडावर तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केले.
त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, "आमच्या महाराष्ट्रात असलेल्या औरंग्याच्या कबरीची आठवण आम्हाला नको आहे. ही हिंदू समाजाची भावना असून आज प्रत्येकजण अस्वस्थ आहे. ज्या औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करून त्यांना संपवले त्याची कबर कशाला हवी?" असा सवाल त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, "काही लोकांना ती कबर आठवण वाटते. पण हिंदू समाज म्हणून आम्हाला ती घाण नको आहे. आमच्या स्वराज्याच्या विरोधात उभी राहणारी कुठलीच चिन्हे आणि घाण आम्हाला नको आहे. ज्यांना ती घाण पाहिजे त्यांनी पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये घेऊन जावी. औरंग्याची कबर नको, ही संपूर्ण हिंदू समाजाची भूमिका असून त्यासाठी राज्यभर आंदोलन होत आहे. आम्ही सरकार म्हणून यावर लक्ष ठेवून आहोत. यावर योग्यवेळी योग्य क्रिया होईल, असा आम्हाला विश्वास आहे," असेही ते म्हणाले.
हलालच्या नावाने मोठी अर्थव्यवस्था उभी
"वर्षानुवर्षे हलाल जिहाद सुरु आहे. हलालच्या नावाने एक मोठी अर्थव्यवस्था उभी केली जात असून तो पैसा जिहादसाठी वापरला जात आहे. एक हलाल सर्टिफिकेट आज ८० ते ९० हजार रुपयांपर्यंत विकले जात आहे. त्यामुळे हिंदू समाजासाठी कुणी पुढे येत असल्यास त्याचे कौतूक करायला हवे. मल्हार या नावासंदर्भातील भावना संबंधित लोकांपर्यंत पोहोचल्या असून ते योग्य निर्णय घेतील. परंतू, जिहादसाठी सुरु असलेल्या अर्थव्यवस्थेच्या विरोधात आपण उभे राहयला हवे. हेच पैसे उद्या लव्ह जिहादसाठी वापरले जातात. त्यामुळे आपण यावर लक्ष ठेवले पाहिजे," असेही मंत्री नितेश राणे म्हणाले.
फोन उचलल्यावर अल्लाहू अकबर म्हणा
"फोन उचलल्यानंतर अल्लाहू अकबर म्हणावे जय शिवराय म्हणू नये. ज्यांचा पक्ष औरंग्याच्या विचारावर चालतो, त्यांनी फोन उचलल्यावर जय शिवराज बोलू नये. नाहीतर राँग नंबर बोलून फोन ठेवायला लागेल. त्यामुळे फोन उचलल्यावर अल्लाहू अकबर म्हणा लोकांना बरोबर कळेल की, हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते आहेत," असा टोलाही त्यांनी शरद पवार गटाला लगावला.