भारताचा स्मार्टफोन निर्यातीचा विक्रम, अवघ्या ११ महिन्यांत दीड लाख कोटींची निर्यात

लवकरच भारत पावणे दोन लाख कोटींचा टप्पा पार करणार, अश्विनी वैष्णव यांची घोषणा

    17-Mar-2025
Total Views | 9
smartphone
 
 
  
नवी दिल्ली : स्मार्टफोन निर्मिती आणि निर्यात या क्षेत्रात भारत नवे उच्चांक प्रस्थापित करत आहे. भारताने स्मार्टफोन निर्यातीत नवा उच्चांक गाठला आहे. २०२२४-२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या फक्त १० महिन्यांत म्हणजे एप्रिल ते जानेवारी या काळात भारताची स्मार्टफोन्सची निर्यात दीड लाख कोटींवर गेली आहे. भारत सरकारच्या प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह या योजनेचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. यातून स्मार्टफोन निर्मिती क्षेत्रात १ लाख ३१ हजार कोटींची गुंतवणुक झाली आहे.
 
भारताची १० महिन्यांतील निर्यातीत तब्बल ५६ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. मागील आर्थिक वर्षात हाच आकडा ९९ हजार १२० कोटी इतका होता. त्यातही महत्वाचे म्हणजे एकट्या जानेवारी महिन्यांत या निर्यातीत १४० टक्क्यांची वाढ होत. २५ हजार कोटींची निर्यात झाली. यात फॉक्सकॉन कंपनी निर्मित आयफोन्सचा वाटा सर्वात अधिक आहे. जवळपास ७० टक्के वाटा हा फक्त आयफोन्स निर्यातीचा आहे. यानंतर टाटा इलेक्ट्रॉनिक्स कडून होणाऱ्या निर्यातीचा क्रमांक लागतो.
 
भारताने स्मार्टफोन निर्मिती आणि निर्यात यांत फारच मोठी मजल मारली आहे. त्यातही गेल्या दशकभरापूर्वी भारताच्या एकूण निर्यात केल्या जाणाऱ्या उत्पादनांत स्मार्टफोनचा क्रमांक ६७वा होता. परंतु भारत सरकारडून दिल्या गेलेल्या उत्तेजनाने आणि सरकार कडून सुरु करण्यात आलेल्या प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह या योजनेने अजूनच हातभार लावला आहे. यामुळे वर्षागणिक भारताची स्मार्टफोन निर्यात वाढत आहे. या उत्तेजनामुळे आर्थिक वर्ष २०२४ यावर्षात हीच निर्यात ९१ हजार ६५२ कोटी इतकी पोहोचली होती.
 
भारताचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबद्दल प्रतिक्रिया देताना भारताची ही निर्यातवाढ अभिमानास्पद असून भारत लवकरच या निर्यातीत पावणे दोन लाख कोटींचा टप्पा पार करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
तुला घाबरण्याची गरज नाही..., शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

"तुला घाबरण्याची गरज नाही...", शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

Mohmmed Shami टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उपवास सुरू असताना पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान ज्यूस प्यायल्याने त्याला एका मौलवीने इस्लामचा धर्म भ्रष्ट केल्याप्रकरणी टीका केली. उपवास सुरू असतानाही तो ज्यूस पित होता. त्याने उपवास पाळल्यावरून काही धर्मांधांनी त्याला धारेवर धरले. त्यानंतर आता त्याच शमीच्या लेकीने धुलीवंदन सणाचा आनंद घेतल्याने टीका करण्यात आली. यामुळे आता मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कट्टरपंथींनी अनेक सीमा ओलांडल्या असल्याचे..