इराणमध्ये हिजाब कायदा आणखी कठोर

ड्रेस कोडचे पालन न करणार्‍या महिलांवर पाळत ठेवणार; डिजिटल साधनांचा वापर

    17-Mar-2025
Total Views |
 
Hijab law gets more stricter in Iran
 
तेहरान:  ( Hijab law gets more stricter in Iran ) इराणमध्ये हिजाब कायदा कठोरपणे लागू करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. याबाबत संयुक्त राष्ट्राच्या अहवालात धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. इराण ड्रोन आणि ‘फेशियल रिकॉग्निशन’सारख्या प्रगत पाळत तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांना हिजाब घालण्यास भाग पाडत आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
 
ड्रोन, अद्ययावत तंत्रज्ञान आणि चेहर्‍यावरून ओळख करणार्‍या अ‍ॅपचा वापर करण्यात आला. तसेच इराणच्या कायद्यानुसार नियमांचे उल्लंघन करणार्‍या महिलांवर नजर ठेवली जात असून त्यांच्या शिक्षेत वाढ केली जाणार आहे. सरकारचे या कारवाईस समर्थन आहे. ‘नाझर’ या मोबाईल अ‍ॅपद्वारे कपड्यांबाबतच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या महिलांची माहिती पोलिसांना मिळते, असे अहवालात नमूद आहे.
 
महिलांप्रति मानवाधिकार कायद्याचे उल्लंघन
 
संयुक्त राष्ट्राने दोन वर्षे संशोधन केल्यानंतर महिलांप्रति मानवाधिकार कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा ठपका ठेवला आहे. ‘नाझर’ अ‍ॅपद्वारे हिजाब परिधान न केलेल्या महिलांना हेरून त्यांची वैयक्तिक माहिती शोधली जाते. त्यानंतर ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली जाते. सार्वजनिक परिवहन क्षेत्रातील वाहने, रुग्णवाहिका आणि टॅक्सीमध्ये हे अ‍ॅप इन्स्टॉल करण्यात आले आहे. त्यानुसार कोणत्या महिलेने हिजाब परिधान केला नाही, याची माहिती गोळा केली जाते. दरम्यान, अद्याप इराण सरकारने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधीही आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता इराणने हिजाबसक्ती अधिक कडक केली होती.
 
निरीक्षण करण्यासाठी ड्रोन तैनात
 
अ‍ॅपच्या मदतीने ऑनलाईन प्रणालीमध्ये वाहनाला फ्लॅग केले जाते. त्यानंतर वाहनमालकाला टेक्स्ट पाठवला जातो, ज्यात वारंवार उल्लंघन केल्यास वाहन जप्त करण्याचा इशारा दिला जातो. सप्टेंबर 2024 मध्ये कायद्याचा आवाका वाढवून रुग्णवाहिका, टॅक्सी आणि सार्वजनिक वाहनाने प्रवास करणार्‍या महिलांचाही समावेश करण्यात आला. अ‍ॅपव्यतिरिक्त इराण सरकारने तेहरान आणि दक्षिणेकडील भागात हिजाब नियमांचे निरीक्षण करण्यासाठी हवाई ड्रोन तैनात करण्यास सुरुवात केली आहे.
  
महिलांना मृत्यूदंडाची तरतूद
  
हिजाब कायद्यामुळे इराणच्या सुरक्षा दलांना नियम लागू करण्यासाठी विस्तारित अधिकारही मिळतील. इराणच्या ‘इस्लामिक दंड संहिते’च्या ‘कलम 286’अंतर्गत दोषी महिलांना फाशीची शिक्षाही होऊ शकते, असे अहवालात म्हटले आहे. 2022 मध्ये नैतिकता पोलिसांच्या कोठडीत 22 वर्षीय महसा अमिनीच्या मृत्यूनंतर निदर्शने सुरू झाली. या कारवाईत शेकडो लोक मारले गेल्याचा संयुक्त राष्ट्रांचा अंदाज आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
तुला घाबरण्याची गरज नाही..., शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

"तुला घाबरण्याची गरज नाही...", शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

Mohmmed Shami टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उपवास सुरू असताना पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान ज्यूस प्यायल्याने त्याला एका मौलवीने इस्लामचा धर्म भ्रष्ट केल्याप्रकरणी टीका केली. उपवास सुरू असतानाही तो ज्यूस पित होता. त्याने उपवास पाळल्यावरून काही धर्मांधांनी त्याला धारेवर धरले. त्यानंतर आता त्याच शमीच्या लेकीने धुलीवंदन सणाचा आनंद घेतल्याने टीका करण्यात आली. यामुळे आता मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कट्टरपंथींनी अनेक सीमा ओलांडल्या असल्याचे..