बांगलादेशी सीमेवर चार रोहिंगे आणि सात बांगलादेशींना अटक, अवैधपणे घुसखोरांकडून दलालाने आकारले २५ हजार रुपये

    17-Mar-2025
Total Views | 7
 
Rohingyas
 
आगरतळा : मेघालय आणि त्रिपुरा सीमावर्ती गावांमध्ये सात बांगलादेशी नागरिक आणि चार रोहिंग्यांना अटक करण्यात आली आहे. सीमेपलीकडून परदेशी नागरिकांना भारतात अवैधपणे घुसखोरी करण्यास मदत करणाऱ्या चार भारतीय दलांनाही अटक करण्यात आली असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने रविवारी दिली आहे. एवढेच नाहीतर काही दलालांनी प्रवेश देण्यासाठी २५ हजार रुपये आकारले असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना १६ मार्च २०२५ रोजी घडली आहे.
 
त्रिपुराच्या सेपाहिजला जिल्ह्यातून बीएसएफने १८७ सेकंड हँड मोबाईल फोन जप्त केले आहेत. बीएसएफ प्रवक्त्याने सांगितले की, एका विशिष्ट माहितीवरून कारवाई करत, मेघालयातील सतर्क बीएसएफ जवानांनी भारत-बांगलादेश सीमेवरील वेगवेगळ्या गावांमधून एका महिलेसह सात बांगलादेशी नागरिकांना आणि दोन भारतीय नागरिकांना अटक करण्यात आली आहे.
 
बांगलादेशी दोन भारतीय दलालांच्या मदतीने तस्करी आणि भारतात अवैधपणे घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर त्रिपुराच्या धर्मनगरमध्ये दोन महिलांसह चार रोहिंग्यांना आणि बांगलादेशातून भारतातील अवैधपणे घुसखोरी करणाऱ्यांसाठी मदतीचा हात देणाऱ्या दोन भारतीय दलालांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
 
दरम्यान, घुसखोरी करणाऱ्या अटक झालेल्या रोहिंग्यांची ओळख ही जाहिद आणि मतजुल हक, मीन तारा आणि पुटू अख्तर अशी आहे. तर अटक केलेल्या दलालांची नावे मुनीम आणि इक्बाल अशी आहेत. अटक करण्यात आलेल्या रोहिंग्यांपैकी एक जाहिद आलमने घुसखोरी करणाऱ्यांकडून १२ हजार रुपये घेत त्यांना मदत केल्याचे प्रकरण आता उघडकीस आले आहे.
 
या प्रकरणातील मूळ दलाल हा म्यानमारचा रहिवासी असलेल्या जाहिद आलमने पोलिसांना आपले दिल्लीत घुसखोरी करण्याबाबतचे मुख्य उद्दीष्ट होते असे सांगितले. सुरक्षा यंत्रणांनी अवैधपणे सीमा ओलांडण्याबाबत सतर्कता दर्शवली. रोहिंग्यांची भारतातील  घुसखोरीबाबत चौकशी करण्यात आली. दरम्यान घुसखोऱ्यांना भारतात प्रवेश देण्यासाठी दलाल २५ हजार रुपये घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
या प्रकरणात आता प्रवक्त्यांनी सांगितले की, त्रिपुरा सिपाहिजाला जिल्ह्यातील मतीनगर भागात भारत-बांगलादेश सीमेच्या दोन्ही बाजूंनी सहा तस्करांच्या संशयास्पद हालचालींना विशेष पथकाने तस्करीच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
तुला घाबरण्याची गरज नाही..., शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

"तुला घाबरण्याची गरज नाही...", शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

Mohmmed Shami टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उपवास सुरू असताना पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान ज्यूस प्यायल्याने त्याला एका मौलवीने इस्लामचा धर्म भ्रष्ट केल्याप्रकरणी टीका केली. उपवास सुरू असतानाही तो ज्यूस पित होता. त्याने उपवास पाळल्यावरून काही धर्मांधांनी त्याला धारेवर धरले. त्यानंतर आता त्याच शमीच्या लेकीने धुलीवंदन सणाचा आनंद घेतल्याने टीका करण्यात आली. यामुळे आता मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कट्टरपंथींनी अनेक सीमा ओलांडल्या असल्याचे..