आता महिला-युवतींची छेडछाड करणाऱ्यांना सुट्टी नाही, मुख्यमंत्री रेखा गुप्तांचा दिल्लीत 'शिष्टाचार पथक' फॉर्म्युला
17-Mar-2025
Total Views |
नवी दिल्ली : दिल्लीत महिलांच्या सुरक्षेसाठी नवनिर्वाचित भाजपच्या महिला मुख्यमंत्री रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांनी कामचा सपाटा लावून धरला आहे. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यांनी नाले आणि नदी सफाईबाबत उचलेले पाऊल उल्लेखनीय आहे. अशातच आता त्यांनी दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेसाठी पाऊल उचलले आहे. यामुळे आता काही महिला, युवतींना छेडछाड करणाऱ्याला सुट्टी नसणार आहे. त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी रेखा गुप्ता सरकारच्या नेतृत्वात शिष्टाचार पथकाच्या फॉर्म्युल्याचा वापर करण्यात येणार आहे.
उत्तर प्रदेशातील अँटी रोमिया पथकाप्रमाणे, महिला आणि युवतींच्या छेडछाड समस्या प्रकरणी पथक असणार आहे. दिल्लीतील प्रत्येक जिल्ह्यात दोन पथके तयार केली जातील, प्रत्येक पथकात एक निरीक्षक, एक उपनिरिक्षक आणि ८ कॉन्स्टेबल आणि एक हेड, तसेच त्यामध्ये ४ महिला पोलिसांचाही समावेश असणार आहे.
तांत्रिक सहय्यासाठी प्रत्येक पथकासोबत विशेष युनिटमधील एक पोलीस कर्मचारी राहील. या छेडछाडी पथकात कार आणि दुचाकीचा समावेश असणार आहे. सर्व महिला आणि युवतींप्रती असणाऱ्या संवेदनशील भागात संबंधित पथक आता तैनात करण्यात येणार आहे. पथकात असलेले पोलीस ड्रेसकोडमध्ये असतील आणि ते महिला आणि युवतींना त्रास देणाऱ्या किंवा त्यांची छेड काढणाऱ्यांना धडा शिकवतील. त्यानंतर पीडित महिला आणि युवतींना तक्रारी नोंदवण्यास सांगितली जाईल.
महिला आणि युवतींसाठी काही संवेदनशील ठिकाणांची माहिती मिळवण्यासाठी पथक म्हणून आरडब्ल्यूए आणि स्थानिक स्वयंसेवकांच्या संपर्कात राहील. दर आठवड्याला पथकात त्यांच्या मोहिमेचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करावा लागणार आहे. दिल्लीतील वाढती गुन्हेगारी आणि दुष्कर्म्यांना कोणतीही सूट न देता त्यावर पथकांच्या माध्यमातून कारवाई केली जाईल.