विधान परिषदेसाठी भाजपकडून संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना संधी
17-Mar-2025
Total Views | 6
मुंबई: ( BJP gives opportunity to Sandeep Joshi, Sanjay Kenekar, Dadarao Keche for Legislative Council maharashtra ) महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी गुरूवार, दि. २७ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपने तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना भाजपने विधान परिषदेसाठी संधी दिली आहे.
संदीप जोशी हे नागपूर महानगरपालिकेचे माजी महापौर आहेत. संजय केनेकर हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस असून, छत्रपती संभाजीनगरमधील भाजपचा प्रमुख चेहरा म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे, तर दादाराव केचे हे वर्धा विधान परिषदेसाठी भाजपकडून संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना संधी जिल्ह्यातील आर्वी मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. २०२४ विधानसभा निवडणुकीत सुमित वानखेडे यांना त्यांच्या जागेवर तिकीट देऊन केचे यांचे विधान परिषदेवर समायोजन करण्यात आले आहे.
रिक्त जागांसाठी दि. २७ मार्चला निवडणूक
आमशा पाडवी (शिवसेना), राजेश विटेकर (राष्ट्रवादी), प्रवीण दटके (भाजप), गोपीचंद पडळकर (भाजप) आणि रमेश कराड (भाजप) हे विधानसभेवर निवडून गेले. त्यामुळे या पाच जागा विधान परिषदेत रिक्त झाल्या आहेत आणि दि. २७ मार्च रोजी त्या जागा भरण्यासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. ‘केंद्रीय निवडणूक आयोगा’ने दिलेल्या कार्यक्रमानुसार विधान परिषद निवडणुकीसाठी दि. १० मार्च ते दि. १७ मार्च रोजीदरम्यान अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पाडण्यात येईल, तर मंगळवार, दि. १८ मार्च रोजी अर्जाची छाननी होईल. दि. २० मार्च रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल आणि दि. २७ मार्च या दिवशी मतदान प्रक्रिया पार पडेल. विरोधी पक्षांकडे एक उमेदवार निवडून येईल, इतकेही संख्याबळ विधानसभेत नसल्याने विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेतील पक्षनिहाय संख्याबळ
विधान परिषदेत एकूण ७८ सदस्य असतात. मात्र सध्या ५२ सदस्यच सभागृहात आहेत. त्यांपैकी ३२ महायुतीचे असून त्यात भाजपचे १९, शिवसेना सहा आणि राष्ट्रवादीचे सात आमदार आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे केवळ १७ आमदार असून काँग्रेसचे सात, शरद पवार गट तीन, उबाठाचे सात आणि तीन अपक्ष सदस्य आहेत.