औरंग्याची कबर तोडली! बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक, नेमकं काय घडलं?

    17-Mar-2025
Total Views | 72

Aurangzeb Kabar Demolished in Kolhapur

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Aurangzeb Kabar Demolished in Kolhapur)
छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरुन राजकीय वातावरण चांगलच तापलंय. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने सोमवारी राज्यव्यापी आंदोलन करत, औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशाराही दिला. अशातच कोल्हापुरात बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसले. औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर आणून ती तोडल्याचे कोल्हापुरात पाहायला मिळाले.

आंदोलनावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एका टेम्पोतून औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर आणली होती. त्यासोबत औरंगजेबाचा एक फोटोही ठेवण्यात आला होता. दरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक कबरीवर दगडफेक केली तसेच औरंगजेबाचा फोटोही उध्वस्त केला. पोलिसांकडून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले.

अग्रलेख
जरुर वाचा
तुला घाबरण्याची गरज नाही..., शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

"तुला घाबरण्याची गरज नाही...", शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

Mohmmed Shami टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उपवास सुरू असताना पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान ज्यूस प्यायल्याने त्याला एका मौलवीने इस्लामचा धर्म भ्रष्ट केल्याप्रकरणी टीका केली. उपवास सुरू असतानाही तो ज्यूस पित होता. त्याने उपवास पाळल्यावरून काही धर्मांधांनी त्याला धारेवर धरले. त्यानंतर आता त्याच शमीच्या लेकीने धुलीवंदन सणाचा आनंद घेतल्याने टीका करण्यात आली. यामुळे आता मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कट्टरपंथींनी अनेक सीमा ओलांडल्या असल्याचे..