कट्टरपंथी अमनने अल्पवयीन युवतीचे केले लैंगिक शोषण, संतप्त लोकांनी मशिदीला घातला घेराव

    16-Mar-2025
Total Views | 38
 

sexually abused  
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील हथरस जिल्ह्यात एका अल्पवयीन चिमुरडीवर अमानुष अत्याचार करण्यात आल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका मुस्लिम युवकाने हैवानी कृत्य करत संबंधित अल्पवयीन पीडितेला बेशुद्ध अवस्थेत सोडून दिले. अल्पवयीन मुलीसोबत असणाऱ्या काही मुलांनी या घडलेल्या घटनेची माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली होती. आरोपीचे नाव अमन असल्याची माहिती समोर आली आहे.
 
 या प्रकरणाची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली होती. परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी पीडितेला जिल्हा रुग्णालयात भरती केले होते. यावेळी डॉक्टरांनी तिचा तपास केला. यावेळी संतापलेल्या लोकांनी मशिदीला घेराव घालत निषेध व्यक्त केला. परिस्थिती लक्षात घेता बाजारतळ बंद करण्यात आले. मुस्लिम युवकाद्वारे एका निष्पाप अल्पवयीन चिमुरडीसोबत हैवानी कृत्य झाल्याच्या निषेधार्थ लोक रस्त्यावर उतरू लागली होती. यामुळे आता घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला.
 
 
 
हे प्रकरण कोतवाली सादाबादमधील आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही शनिवारी रात्री इतर काही मुलांसोबत बाजारात सामान आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी संबंधित प्रकरणात असलेल्या मुस्लिम आरोपीने पीडितेला सोबत घेतले आणि तिच्यावर अमानुष अत्याचार केला. यावेळी पीडितेसोबत गेलेल्या काही मुलांनी पीडितेच्या कुटुंबीयांना घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. त्यावेळी तिची शोधाशोधही करण्यात आली, त्यानंतर मुलगी ही एका पोखरच्या सीमेवर बेशुद्ध अवस्थेत पडली होती.
 
यानंतर याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी पीडितेला सीएससी सादाबाद येथे दाखल केले. त्यानंतर त्यांनी हथरस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर परिस्थिती पाहता, पीडितेला अलीगड मेडिकलमध्ये परिक्षणासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पीडित मुलगी अद्यापही बेशुद्ध असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची शोधमोहिम सुरू ठेवली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, पीडित मुलीवर अद्यापही जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
 
 
या प्रकरणी एसपी हथरस चिरंजीवी नाथ सिन्हा यांनी सांगितले की, ही घटना बिसावार ठाणे परिसरात एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याची आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा