शरद पवार गटाचा पोपट

    15-Mar-2025
Total Views | 31

sharad pawar-led ncp protesters block pune metro for 2 hours
आजकाल राजकारणात आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी, काही रिकामटेकडे लोक समाजमाध्यमे आणि वाहिन्यांवरून प्रकाशझोतात येण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात आणि आपले हसेच करून घेतात. अशी काही स्टंटबाजी केली की, आपण नेते बनतो किंवा आपल्या ‘गॉडफादर’च्या मर्जीत राहतो, असा या दीडशहाण्यांचा भ्रम. मग केवळ उपद्रव माजविणे, एवढे एकच आपले कर्तव्य, असा समज लोकांमध्ये रुजविण्याचा घातक प्रयास अशा मंडळींनी सुरूच ठेवला आहे. वस्तुतः यातून काहीही साध्य होत नाही. ना जनतेचे प्रश्न हे लोक सरकार दरबारी नेऊन सोडवू इच्छितात आणि ना त्यातून आपल्या परिसरासाठी वा मतदारसंघासाठी काही विधायक काम केल्याचे सिद्ध करीत असतात. त्यांना केवळ आणि केवळ प्रसिद्धीझोतात राहण्याची हौस असते. दुर्दैवाने त्यांची हीच हौस अगदी सहज भागविण्याचे काम (आता त्याला ‘दुष्कृत्य’ म्हणायचे की, आणखी काही हे ठरवावे लागेल किंवा त्याची नवी व्याख्या तयार करावी लागेल.) समाजमाध्यमे आणि वाहिन्या करीत असल्याने समाजात सकारात्मकता पसरण्याऐवजी नकारात्मकताच वाढलेली दिसते, जी नक्कीच या प्रगतिशील राज्याच्या हिताच्या दृष्टीने योग्य नाही.
 
आता हे सर्व येथे नमूद करण्याचे कारण असे की, अलीकडेच पुण्यात शरद पवार गटाच्या आंदोलकांनी चक्क प्रसिद्धी पदरात पाडण्यासाठी मेट्रो प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रताप केला. या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी आपल्या एवढ्या मोठ्या नेत्याच्या कर्तृत्वालाच जणू बट्टा लावण्याचे काम केले. त्यांच्या आंदोलनाचा अगदी काही तासांतच ‘पोपट’ झाल्याने राज्यातच या पक्षाची शोभा झाली. मात्र, तरीही एकेकाळी चक्क काँग्रेस पक्षालाच आव्हान देणार्‍या या पक्षाने राज्यात आपले बस्तान बसविता बसविता देशव्यापी होण्याचे स्वप्न बघून, आपली केविलवाणी अवस्था करून घेतली आहे, हे सुज्ञांना वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे आगामी काळातदेखील आताची या पक्षातील पिढी पक्षाचा असाच नुसता ‘पोपट’ करीत राहणार का? हा कळीचा मुद्दा होऊन बसला आहे.
काँग्रेस पक्षाची शेळी
  
एकेकाळी काँग्रेस पक्षाची पुणेच नव्हे तर अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रात चलती होती. गांधी-नेहरू घराण्याचा वरदहस्त या भागातील अनेक नेत्यांवर राहिल्याने हा भाग तसा काँग्रेसचा बालेकिल्लाच म्हणविला जायचा. मात्र, या पक्षात राहूनच गद्दारी काय असते, हे चक्क याच भागातील एका ज्येष्ठ नेत्याने काँग्रेस पक्षाला केवळ दाखवूनच दिले नाही, तर त्या पक्षाची चक्क झोप उडवली. गंमत अशी की, अजूनही त्या दिवसापासून ते आजतागायत काँग्रेसच्या नेत्यांना ती गद्दारी आठवली की झोप लागत नाही. नेमका राजकारणात कसा भूकंप होईल, हे काँग्रेसच्या नेत्यांसाठीही अनाकलनीय असते. दुर्दैवाने याच नेत्याच्या दावणीला हाच काँग्रेस पक्ष अलीकडील काळातदेखील आला आणि उबाठा, काँग्रेस, आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असे सरकार जनतेच्या नशिबी आले. या सरकारने काय दिवे लावले, ते वेगळे सांगायला नकोच. त्यानंतर चक्क यातील दोन्ही पक्षांची शकले झाली, हेदेखील सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. यातून ‘गद्दारी’, ‘खोके’ असे नारे लावले जाऊ लागले.
 
मात्र, या लोकांना हे माहीतच नव्हते की, राजकारणात गद्दारीची सुरुवात करणार्‍या नेत्याच्या नेतृत्वातच आपण हे नारे देत आहोत. अखेर काहींना हे सहन झाले नाही आणि त्यांनी चक्क या नेत्याचा पाणउतारा करीत, वेगळी वाट धरली आणि इकडे उरलेल्या काँग्रेस पक्षाची तर दावणीला बांधलेल्या शेळीसारखी अवस्था झाली. ना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हा पक्ष या भागात काम करू शकला आणि ना आपले अस्तित्व टिकवू शकला. निष्ठावंतांना बाजूला सारत आयात केलेल्या उमेदवाराला तिकीट देऊन, या पक्षाने स्वतःच्या अस्तित्वावरच आता प्रश्नचिन्ह उभे केले आहे. रविंद्र धंगेकरांनी आता याच पक्षाला रामराम ठोकला. त्यामुळे येथील काँग्रेस पक्षातील निष्ठावंत असलेल्यांना धंगेकर असतानादेखील आपली जागा कोणती आणि ते गेल्यावरदेखील आपली जागा या पक्षात कोणती,हे उमगेनासे झाले आहे. कानामागून आला आणि हा माणूस आमदारकी भोगून गेल्याचे दुःख या काँग्रेसी यांना अधिक आहे म्हणे!
 
 
 
 
अतुल तांदळीकर
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
आता महिला-युवतींची छेडछाड करणाऱ्यांना सुट्टी नाही, मुख्यमंत्री रेखा गुप्तांचा दिल्लीत

आता महिला-युवतींची छेडछाड करणाऱ्यांना सुट्टी नाही, मुख्यमंत्री रेखा गुप्तांचा दिल्लीत 'शिष्टाचार पथक' फॉर्म्युला

Rekha Gupta दिल्लीत महिलांच्या सुरक्षेसाठी नवनिर्वाचित भाजपच्या महिला मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी कामचा सपाटा लावून धरला आहे. त्यानी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यांनी नाले आणि नदी सफाईबाबत उचलेले पाऊल उल्लेखनीय आहे. अशातच आता त्यांनी दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेसाठी पाऊल उचलले आहे. यामुळे आता काही महिला, युवतींना छेडछाड करणाऱ्याला सुट्टी नसणार आहे. त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी रेखा गुप्ता यांनी शिष्टाचार पथकाच्या फॉर्म्युल्याचा वापर ..

कबरीच्या वादात सुप्रिया सुळेंची उडी; म्हणाल्या, बऱ्याच गोष्टी या आस्थेचे विषय...

कबरीच्या वादात सुप्रिया सुळेंची उडी; म्हणाल्या, "बऱ्याच गोष्टी या आस्थेचे विषय..."

राज्यात औरंगजेबच्या कबरीवरून तणाव चांगलाच वाढल्याचं दिसतंय. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानेही सोमवारी कबर हटवण्यावरून राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका मांडल्याचं पाहायला मिळतंय. "जो काही निर्णय घ्यायचा आहे तो इतिहासकारांना घेऊ द्या. बऱ्याच गोष्टी या आस्थेचे विषय असतात. प्रत्येकाच्या आस्थेचा विषय असून यात कोणीही ढवळाढवळ करू नये", असे सुप्रिया सुळे यांचे म्हणणे आहे. Supriya Sule on Aurangzeb Kabar..