रिना, किरण आणि आता गौरी? तिसऱ्यांदा हिंदू महिलेशी आमिर खान करणार ६०व्या वर्षी निकाह?
15-Mar-2025
Total Views | 17
मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानच्या आयुष्यात नवी प्रेम कहाणी सुरू झाली आहे. ६० वर्षांचे होण्याच्या एक दिवस आधी, गुरुवारी १३ मार्च रोजी त्याने आपल्या गर्लफ्रेंड गौरी स्प्राटची माध्यमांसमोर ओळख करून दिली. आमिर म्हणाला की, तो आणि गौरी गेल्या दीड वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि आता हे लपवण्याची गरज नाही.
ही भेट मुंबईतील एका छोट्या कार्यक्रमात झाली. आमिर हसत म्हणाला, “मला वाटले, हा योग्य क्षण आहे की तुम्ही सगळयांनी तिला भेटयला हवं. काल रात्रीच ती शाहरुख आणि सलमानला भेटली.” १४ मार्च रोजी आमिर ६० झाला, या खास प्रसंगी त्याने गौरीला सर्वांसमोर आणले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौरी मूळ बेंगळुरूची रहिवासी आहे. आमिर आणि गौरी एकमेकांना २५ वर्षांपासून ओळखतात. दीड वर्षांपूर्वी गौरी मुंबईत आली आणि त्यानंतर त्यांची पुन्हा भेट झाली. आमिर म्हणाला, “आमची भेट अचानक झाली, मग गप्पा सुरू झाल्या, आणि सगळं आपोआप पुढे सरकत गेलं.” गौरीला ६ वर्षांचा मुलगा आहे आणि ती सध्या आमिरच्या प्रोडक्शन कंपनीत काम करतात.
आमिरने सांगितले की, गौरीसोबत त्यांना खूप आनंद आणि मानसिक शांतता मिळते. आपल्या जुन्या लग्नांविषयी बोलताना तो म्हणाला, “मी खूप नशीबवान आहे की माझे नाते नेहमीच मजबूत राहिले. रीना सोबत १६ वर्षे, त्यानंतर किरणसोबत १६ वर्षे घालवली. आजही किरणसोबत माझे चांगले नाते आहे. आता गौरीसोबत मला सुकून मिळतो.” गौरी म्हणाल्या की, त्यांना एक समजूतदार आणि दयाळू माणूस हवा होता, आणि तो त्यांना आमिरमध्ये मिळाला. लग्नाबद्दल विचारल्यावर आमिर हसत म्हणाला, “६० व्या वर्षी लग्न करणे मला शोभेल का, माहीत नाही.” त्याने हेही सांगितले की त्यांच्या मुलांना या नात्याबद्दल आनंद आहे. आमिरच्या पहिली पत्नी रीना दत्ता ही फिल्म प्रोड्यूसर होती, तर दुसरी पत्नी किरण राव डायरेक्टर आहे. दोघींशीही त्याचे अजूनही चांगले संबंध आहेत. आमिर म्हणाला, “माझ्या माजी पत्नींसोबत माझे नाते उत्तम आहे, मी खरोखर नशीबवान आहे.”
मुंबईत सलून चालवतात गौरी स्प्राट
आमिरच्या चाहत्यांसाठी ही बातमी आश्चर्याची ठरली, कारण दीड वर्ष कोणालाही याची कल्पना नव्हती. मात्र, आता ते आपल्या आयुष्याचा हा नवा अध्याय खुल्या मनाने जगत आहेत. गौरीला बॉलिवूडच्या जगमगाटाची सवय नाही, पण ती हळूहळू हे समजून घेत आहेत. गौरी स्प्राट ही मूळ बेंगळुरूची असून तिचे वडील तमिळ-ब्रिटिश व आई पंजाबी-आयरीश आहे. मात्र, त्या स्वतःला भारतीय मानतात. तिने लंडनमध्ये फॅशनचे शिक्षण घेतले असून मुंबईत बि.बि.लन्ट सलून चालवतात. गौरी देखील पूर्वी विवाहित होती आणि तिला ६ वर्षांचा मुलगा आहे. दरम्यान, आमिरची आगामी फिल्म सितारे जमीन पर जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे. ही त्यांची हिट फिल्म तारे जमीन पर याचा सिक्वेल आहे. याशिवाय, ते लाहौर १९४७ ही ऐतिहासिक ड्रामा फिल्म प्रोड्यूस करत आहेत, जी राजकुमार संतोषी दिग्दर्शित करणार आहेत.