नाना पटोलेंची शिंदे-दादांना ऑफर! वडेट्टीवारांनी टोचले कान, म्हणाले, "त्यांनी असं करण्याची फार..."
15-Mar-2025
Total Views | 23
नागपूर : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शुक्रवार, १४ मार्च रोजी होळीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली. मात्र, यावर विजय वडेट्टीवार यांनी वेगळेच मत व्यक्त केले. नाना पटोलेंनी घाई केली असल्याचे ते म्हणाले.
पटोलेंची ऑफर काय?
अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची हालत खराब आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेससोबत यावे, आम्ही त्यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण करू. त्या दोघांनाही मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ वाटून देऊ, अशी ऑफर नाना पटोले यांनी दिली. यावेळी त्यांनी भाजपवर टीकादेखील केली.
यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, "नाना पटोलेंनी दिलेली ऑफर मी माध्यमांमध्ये पाहिली. राजकारणात कुणी कुणाचा दुश्मन नसतो आणि कुणी कुणाचा दोस्तही नसतो. वेळेनुसार, संपूर्ण राजकारण सुरु असते. त्यामुळे उद्याचे काय वाढून ठेवले आहे हे आताची धुसफूस पाहता पुढे काय होईल याबद्दल सांगणे कठीण आहे. पण नाना पटोलेंनी घाई केली, एवढेच माझे म्हणणे आहे," असे ते म्हणाले.