श्रीमंत होशील असे आमिष दाखवत मुस्लिम मुलीने हिंदू युवतीला रोजा धरण्यास पाडले भाग, धर्मांतर करण्याचा कट्टरपंथी युवतीचा होता डाव
15-Mar-2025
Total Views | 28
लखनऊ : उत्तर प्रदेशातील झाँसीमध्ये धर्मांतर (convert) करण्याची एक धक्कादायक घटना घडली. एका हिंदू युवतीला एका मुस्लिम युवतीने रोजा धरण्यास सांगितला आणि नमाज पठण करण्यास सांगितली. ज्यामुळे तु लवकर श्रीमंत होशील असे आमिष तिने दाखवले. संबंधित मुस्लिम युवतीचे नाव हे शहनाज होते. हिंदू युवतीचे नाव हे करीश्मा होते. त्या दोघीही एकमेकांच्या अगदी जवळच्या मैत्रिणी असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेली ३-४ दिवस हिंदू युवती करीश्माने नमाज पठण केली आणि उपवासही धरते. त्यानंतर ही बाब करीश्माच्या घरी समजताच त्यांना धक्काच बसला, ही अशी का करत आहे? असा प्रश्न तिच्या कुटुंबियांना उपस्थित झाला. त्यावेळी हे सर्व मला शहनाजने सांगितले आहे. ज्यामुळे आपण लगेचच श्रीमंत होऊ असे तिने सांगितल्याने तिने उपवास धरल्याचे सांगितले.
या घडलेल्या घटनेवरून करीश्माच्या कुटुंबियांनी शहनाजचा घरी जात घडलेल्या घटनेचा निषेध केला. त्यावेळी शहनाजने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा करीश्माच्या काकाने तिला वाचवले आणि शहनाजने तिथून पळ काढला. यानंतर घटनास्थळी हिंदू संघटनेचे लोक दाखल झाले. त्यावेळी शहनाजचे धर्मांतर करण्याचा डाव असल्याचा सांगितले. यावेळी पीडितेच्या पालकांनी आपल्या मुलीला धर्मांतराच्या जाळ्यात अडकवण्यावरून टीका केली.
तर दुसरीकडे आता सीओ सिटी स्नेहा तिवारी म्हणाल्या, "वडिलांच्या तक्रारीवरून, शहनाज उर्फ सनाविरूद्ध उपवास ठेवण्यास, नमाज पठण करण्यास आणि धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडल्याने विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणात लक्ष घालत तपास करत आहेत."