हिंदी विरोधी स्टॅलिन सरकारवर पवन कल्याणचा हल्लाबोल

    15-Mar-2025
Total Views | 8

Pawan Kalyan Comment on Stalin Government

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Pawan Kalyan Comment on Stalin) 
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला विरोध आणि हिंदी लादल्याचा आरोप गेले काही दिवस तामिळनाडूच्या नेत्यांकडून होतो आहे. यावर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी तामिळनाडूच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. या प्रकाराला ढोंगीपणा म्हणत एकीकडे हिंदीला विरोध आणि दुसरीकडे हिंदीत डबिंग करून नफा कमवण्याचे धंदे कशाला, असा थेट सवाल त्यांनी केला आहे.

हे वाचलंत का? : होळीला धर्मांधांचे गालबोट; बंगालमध्ये कट्टरपंथींचा हिंदूंवर हल्ला!

पवन कल्याण म्हणाले की, तमिळनाडूचे नेते हिंदीला विरोध करतात, पण आर्थिक फायद्यासाठी त्यांचे तामिळ चित्रपट हिंदीत डब करू देतात. त्यांना बॉलीवूडकडून पैसे हवे आहेत, पण हिंदी स्वीकारण्यास नेत्यांचा नकार आहे. भारताला तामिळसह अनेक भाषांची गरज आहे, फक्त दोन भाषांची नाही. आपण भाषिक विविधता स्वीकारली पाहिजे, जेणेकरून आपल्या देशाची एकात्मता तर टिकेलच, पण आपल्या लोकांमध्ये प्रेम आणि सौहार्दही वाढेल.

केंद्र सरकार एनईपीच्या त्रि-भाषा सूत्राद्वारे हिंदी लादण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी केला होता. एनईपी हे भारताच्या विकासाऐवजी हिंदीला प्रोत्साहन देणारे ‘भगवा धोरण’ असल्याचे म्हटले होते. स्टॅलिन यांच्या भूमिकेवर पवन कल्याण यांनी सणसणीत उत्तर दिल्याचे दिसते आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
मराठी चित्रपटसृष्टिला धर्मा प्रॉडक्शनचं पाठबळ; ये रे ये रे पैसा ३

मराठी चित्रपटसृष्टिला धर्मा प्रॉडक्शनचं पाठबळ; ये रे ये रे पैसा ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित!

ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर, हिट मराठी कॉमेडी फ्रँचायझी तिसऱ्या भागासह परतली आहे.ये रे ये रे पैसा ३ अखेर येत आहे. यावेळी, निर्माते आणखी गोंधळ आणि मनोरंजनाचे आश्वासन देत आहेत. संजय जाधव हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत, तर त्यांनी आणि अरविंद जगताप यांनी एकत्रितपणे पटकथा लिहिली आहे. तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, आनंद इंगळे, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, वनिता खरात, नागेश भोंसले आणि विशाखा सुभेदार या कलाकारांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. धर्मा प्रॉडक्शन्स ..