मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नाना पटोलेंनी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात त्याचे चांगलेच पडसाद उमटले. मात्र, आता नाना पटोलेंनी आपल्या या वक्तव्यावरून युटर्न घेतला आहे. मी हा विषय गमतीत घेतला असल्याचे ते म्हणाले आहे.
नाना पटोले म्हणाले की, "काल होळीचा दिवस होता, धुलीवंदनाचा दिवस होता आणि आमच्या संस्कृतीमध्ये या सणाचे विशेष महत्त्व आहे. आपापसातील सगळे मतभेद विसरून आम्ही सर्वांनी राज्यातील प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून दिला पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या ज्या राजकीय घडामोडी सुरु आहेत त्यावर सुरुवातीलाच बुरा ना मानो होली है, असे म्हणून त्या विषयाला मी गमतीत घेतले. काही लोकांनी हे सिरीयस घेतले असतील तर त्यांनी सिरीयस राहावे," असे म्हणत त्यांनी युटर्न घेतला.