बांग्लादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी लातूरमध्ये गुन्हा दाखल! ९ जणांची नावे समोर
15-Mar-2025
Total Views | 18
लातूर : बांग्लादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी लातूरमध्ये ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली.
बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा लातूर
१३ मार्च रोजी एफआयआर ८९ दाखल करण्यात आला कलम बीएनएस ३१८(४), ३३८, ३३६(३), ३४०(२) फसवणूक, बनावटगिरी, फसवणूक....
गुरुवार, १३ मार्च रोजी बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी लातूर येथे कलम बीएनएस ३१८(४), ३३८, ३३६(३), ३४०(२) फसवणूक, बनावटगिरी अंतर्गत ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मदार युसुफ पठाण, अनीरूनीसा मोहम्मद, फैमुन्बी अय्युब मणियार, शाहिदा शौकत कुरेशी, फरहीन तौसीफ करेशी, हुसेंन गफूर शेख, नाजेरा अब्दुल खुदुस, रूक्सार मोसीन कुरेशी, मुस्तफा महेबुब अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहे.
या सर्वांनी बनावट आधार कार्ड, बनावटी दस्तावेज आणि खोटे शपथपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप आहे. दरम्यान, किरीट सोमय्या सातत्याने राज्यातील घुसखोर बांग्लादेशी-रोहिंग्यांविरोधात आवाज उठवत असून सगळ्या आपात्र बांग्लादेशींना महाराष्ट्रातून हाकलणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.