मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Islamist Comment on Mohammed Shami daughter) भारताता वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी कायम इस्लामिक कट्टरपंथींच्या निशाण्यावर असतो. रमजानच्या काळात शमीने उपवान न पाळल्याबद्दल त्याला टार्गेट करण्यात आलं होतं. मात्र आता होळीच्या निमित्ताने रंगात न्हाऊन निघालेल्या शमीच्या मुलीलाही काही धर्मांधांनी लक्ष्य केल्याचे दिसतंय. शरीया कायद्याचे उल्लंघन केल्याच्या प्रतिक्रिया धर्मांधांकडून उमटत आहेत.
हे वाचलंत का? : हिंदी विरोधी स्टॅलिन सरकारवर पवन कल्याणचा हल्लाबोल
मोहम्मद शमीची पूर्व पत्नी हसीन जहाँच्या एका पोस्टवरून हा वाद निर्माण झाला आहे. हसीन जहाँने शुक्रवारी (१४ मार्च) आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिची मुलगी आयरा शमीचा फोटो शेअर केला, ज्यामध्ये आयरा रंगांशी खेळताना दिसत आहे. त्याखाली या फोटोसह हसीन जहाँने होळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. मात्र ही पोस्ट पाहून इस्लामिक कट्टरपंथींना चांगचीच पोटदुखी झाल्याचं पाहायला मिळतंय. काहींनी रमजानचा उल्लेख केलाय तर काहींनी शिव्याशाप दिले आहेत.
शमीच्या भूमिकेवर मौलानाचा आक्षेप
मोहम्मद शमी इस्लामिक कट्टरपंथींच्या निशाण्यावर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. अलीकडेच चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान शमीचा ज्यूस पितानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावर ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी त्यास गुन्हेगार म्हटले होते. शमीने शरिया कायद्याचे उल्लंघन केले असून त्याने शरियतचे नियम पाळत उपवास ठेवायला हवा होता, असे मत शहाबुद्दीन रझवीने व्यक्त केले होते.