हिंदूंच्या धार्मिक खानपान संस्कृतीमध्ये ‘झटका’ मटण स्वीकार्य आहे. त्यासंदर्भात दि. 10 मार्च रोजी पुणे येथे राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी हिंदूंसाठी ‘झटका’ मटण उपलब्धतेसाठी ‘मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम’चे उद्घाटन केले. महाराष्ट्रात त्यावर चांगलाच वादंग रंगला आहे. त्याअनुषंगाने ‘झटका’ आणि ‘हलाल’ मटण, तसेच ‘मल्हार सर्टिफिकेशन’विषयी या लेखात सारांश रूपाने केलेली ही मांडणी...
“मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकाने उपलब्ध होतील. जिथे 100 टक्के हिंदू समाजाचे प्राबल्य असेल. विकणारा व्यक्तीदेखील हिंदू असेल. कुठेही मटणामध्ये भेसळ झालेली आढळणार नाही. ‘मल्हार सर्टिफिकेशन’चा वापर जास्तीत जास्त करावा. भेसळ नसलेले आणि ‘झटका’ मटण मिळावे म्हणून ‘मल्हार सर्टिफिकेट’ असलेल्या दुकानातूनच हिंदूंनी मटण खरेदी करावे. किंबहुना, जिथे ‘मल्हार सर्टिफिकेशन नसेल, तिथे मटण खरेदी करू नये,” असे आवाहन राज्याचे मत्स्य व्यवसायमंत्री नितेश राणे यांनी केले. ‘झटका’ पद्धतीचे मटण उपलब्ध करून देणार्या ‘मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम’चे उद्घाटनही त्यांनी केले. भेसळ नसलेले आणि हिंदू पारंपरिक पद्धतीने उपलब्ध केलेल्या मटणासंदर्भात ते बोलले. मात्र, नितेश राणे यांच्या मटणाच्या या बेताबद्दल अनेकांना ठसका लागला. निधर्मी पुरोगामी वगैरे असलेले शरद पवार म्हणाले, “झटका मटण काय राष्ट्रीय विषय आहे का? इतरही अनेक समस्या आहेत.” तर त्यांचे चेले जितेंद्र आव्हाड म्हणाले, “आम्ही लहाणपणापासून मटण खातो. आता ते ‘हलाल’ आहे का ‘झटका’ हे आम्ही कधीच विचारत नाही. हे करण्याची काय गरज?” उबाठा सेनेचे नेते संजय राऊत म्हणाले, “हे सगळे हिंदू-मुसलमान भेद करण्यासाठी सुरू आहे. हा एक मूर्खपणा आहे. यातून देश जळेल देशाचे विभाजन होईल.” समाजवादी पक्षाचे रईस शेख यांचे म्हणणे, “मल्हार सर्टिफिकेट देणे ही चांगली गोष्ट आहे. आपल्या इच्छेनुसार लोक मटण खातील. पण, नितेश राणेने हेसुद्धा सांगावे की, सरकारची या ‘मल्हार सर्टिफिकेट’ योजनेला मान्यता आहे का?” थोडक्यात, ‘मल्हार सर्टिफिकेशन’ने महाराष्ट्रात वादळच उठले. हिंदूंनी त्यांच्या प्रथे, रितीरिवाजाप्रमाणे ‘झटका’ पद्धतीचे मटण विकणे आणि खरेदी करणे, यावर तर या सगळ्यांनी आक्षेप घेतला. तसेच, काही हिंदूद्वेषी लोक तर अगदी जिवाच्या आकांताने तडफडून उठले. त्यांचे म्हणणे, “आम्हाला सल्ली, नळ्या, वजडी, बोटी मिळण्याशी मतलब. आम्हाला ‘हलाल’चे मटण चालते. तुम्हीच खा ‘झटका’ मटण!” अर्थात, मुस्लीम पद्धत प्रथा मानणार; पण हिंदू प्रथेला विरोध आहे, असेच त्यांना म्हणायचे होते.
असो. ‘मल्हार सर्टिफिकेट’ला विरोध करणार्यांचे हे म्हणणे वरवर जरी असेच वाटत असले, तरीसुद्धा त्याच्या अंतरंगातला अर्थ व्यापक आहे बरं. कारण, आज बोकडाच्या मटणाला एक किलोला 800 रुपये असा भाव मिळतो. मटण खरेदी-विक्री व्यवसायदेखील तेजीत आहे. मटण विक्रीचे दुकान कुणाचे असते? त्या दुकानात कामगार वर्ग कोण असतो? अपवाद वगळता, मटणाची दुकाने ही बहुतांश मुस्लिमांचीच असतात. महाराष्ट्रातला मटणमांस बाजार हा मुस्लिमांच्या हातात गेला आहे. कष्ट करून पोट भरणे, पैसे कमावणे हा काही गुन्हा नाही. त्यामुळे या मांसमटण विक्रेत्यांबद्दलही काही म्हणणे नाही. पण, म्हणणे आहे हिंदूंच्या श्रद्धेचे, हिंदूच्या परंपरेचे! या दुकानात असणारे मटण हे हिंदूंच्या प्रथेनुसार ‘झटका’ पद्धतीचे असते का? तर अर्थातच नाही. ते ‘हलाल’ मटणच विक्रीस ठेवतात. आता प्रश्न आहे की, हिंदू समाजातील अनेक जाती, पोटजाती मटण खातात. पण, तडफडून मृत्यू मिळालेल्या आणि वेदनांनी क्षणक्षण मरणार्या पशूचे मटण खाणे हे कोणाही खर्या हिंदूंना कधीही आवडेल का? अर्थातच नाही!
पण, दुर्दैवाने आज हिंदूंसाठी ‘झटका’ मटण सहज उपलब्ध नाही. कारण, हा पारंपरिक व्यवसाय करणार्या हिंदू खाटिक समाजाला या व्यवसायात अनेक अडचणी निर्माण झाल्या. पशू खरेदी करण्यापासूनच ही सुरुवात आहे. पशू विक्री करणारे व्यावसायिक तसेच मध्यस्त हे मुस्लीमच आहेत. ते हिंदू खाटिकांपेक्षा मुस्लीम व्यक्तीलाच व्यवसायासाठी प्राधान्य देतात. मटण दुकानासाठी परवाना लागतो. ते मिळवण्यासाठीच्या अटीशर्तीही मोठ्याच आहेत. या व्यवसायाचे एक विश्व आहे. त्या विश्वाची सगळी वर्तुळ आता मुस्लीम समाजाच्या हातात गेल्याने हिंदू खाटिक समाजातील नव्या पिढी या व्यवसायात उतरताना दहावेळा विचार करते. दुसरीकडे हिंदू समाज आपल्या पूर्वपार प्रथा, रितीरिवाज विसरला की काय, असे चित्र आहे. मुस्लीम कुठेही गेले, तरी मटण म्हटले की, ‘हलाल’ मटणच हवे, असा नियम पाळतात, तर हिंदू (अपवाद वगळता) ‘झटका’ मटणासाठी आग्रही नसतात. त्याबाबत जागृती नाहीच! या अनुषंगाने काही लोकांचे म्हणणे आहे की, “हिंदूंनी हिंदूसाठी ‘मल्हार सर्टिफिकेट’ दुकान काढणे हे योग्यच आहे. कारण शंका असते की, विकत घेतलेले मटण नक्की बोकडाचे आहे का? त्यात हिंदूंना निषिद्ध असलेले मांस तर मिसळले नसेल ना? त्यामुळे हिंदू श्रद्धांचा आदर करणारे मटण विक्रेते असतील तर चांगलेे. त्यामुळे मनात कोणती शंका राहणार नाही.” याच परिक्षेपात ‘मल्हार सर्टिफिकेट’ केवळ हिंदू खाटिक समाजाच्या व्यक्तीच्या मटण दुकानालाच मिळणार आहे. हिंदू समाज या दुकानांतून मास खरेदी करेल. त्यातून हिंदूंची दुकान सुरळीत अर्थार्जन करतील. त्यामुळे या समाजाच्या अर्थगतीस चालना मिळेल, असे वाटते.
‘झटका’ मटणाला विरोध करणार्यांनी प्रश्न विचारला की, ‘मल्हार योजना काय सरकारची आहे का?’ तर यानुसार भारतातील ‘हलाल’ योजनाही भारत सरकारची नाहीच की! जगभरातील देशांमध्ये ‘हलाल सर्टिफिकेशन’साठी त्या त्या देशातील सरकारी योजना काम करतात. मात्र, भारतात ‘हलाल सर्टिफिकेट’ सरकार देत नाही, तर खासगी संस्था देतात. एका सर्वेक्षणानुसार, वैश्विक मुस्लीम बाजार सात ट्रिलियन अमेरिकी डॉलर्स इतका आहे. ज्यामध्ये ‘हलाल’ खाद्य बाजाराचे अनुमानित मूल्य 1.7 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्स आणि ‘हलाल’ सौंदर्य प्रसाधनाचे मूल्य 75 अब्ज अमेरिकी डॉलर्स आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचाही हिस्सा होणारी ही ‘हलाल’ अर्थव्यवस्था. यातील नफ्याचे पैसे कुठे जातात? तर यावर भाजपचे नेते सीटी रवी यांनी म्हटले होते की, “हलाल अर्थव्यवस्था म्हणजे आर्थिक जिहाद आहे.” त्यानुसार पुन्हा काही लोकांचे म्हणणे आहे की, इस्लामिक विश्व आणि इस्लामिक अर्थव्यवस्था उभी राहावी, यासाठी ‘हलाल’ अर्थव्यवस्थेचा वापर काही लोक करतात. या व्यवस्थेतील काही लोक ‘शरिया कायदा’ जगभर प्रस्थापित व्हावा, जगाचे इस्लामीकरण व्हावे, यासाठी काम करणार्या दहशतवादी संघटनांनाही पैसा पुरवतात. ते असे का करतात? तर त्यांच्या मते, जगाचे इस्लामीकरण करणे, हे पाक म्हणजे पवित्र कृत्यच आहे.
या सगळ्यामुळे वाटते की, आपल्या कष्टाची कमाई या अशा प्रकारामध्ये गुंतवणे हिंदूंसाठी योग्य नाहीच. हिंदूंनी या ‘हलाल’ व्यवस्थेचा भाग का व्हावे? आपली धर्मपद्धत, श्रद्धा अवलंबून हिंदूंच्या दुकानातून ‘झटका’ मटण का खरेदी करू नये? प्रत्येक धर्माची खानपान संस्कृतीची आणि आपल्या श्रद्धा-परंपरा आहेत. हिंदूंनी आपल्या धर्मसंस्कृतीची पाळेमुळे का सोडावी? ‘मल्हार सर्टिफिकेट’ योजनेने या परंपरेकडे पुन्हा वळूया! ‘झटका’ की ‘हलाल’ हा प्रश्नच नाही. प्रश्न आहे, ‘झटका’ मटण खरेदी-विक्रीतून श्रद्धेसह आपलाच हिंदू बांधव आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा! सगळ्याच जगण्यात हिंदू म्हणून आपला पैसा समाजाच्या उत्कर्षासाठी वापरण्याचा!
‘झटका’मध्येही पथ्य हवेच!
‘झटका’ पद्धत अवलंबून त्या पशूला जास्त यातना न होता जरी मारले, तरीसुद्धा हिंदू म्हणून आणि माणूस म्हणून दुकानदारांनीं काही गोष्टी निश्चितच पाळाव्यात. जसे त्या पशूला मृत्यूपूर्वी स्वच्छ, आनंदी, वातावरण द्यावे, दुसर्या कोणत्याही पशूची हत्या त्याच्यासमोर करू नये. मृत्यूची भीती त्याची वेदना त्याला जाणवू देऊ नये. दुसर्या सजीवाला अन्न म्हणून वापर करताना किमान इतके तरी पथ्य पाळायलाच हवे.
दिव्या राव-साळवी,
सामाजिक कार्यकर्ता
‘मल्हार सर्टिफिकेशन’ योजनेचे स्वागत
‘मल्हार सर्टिफिकेशन’ योजना अत्यंत स्तुत्य आहे. मात्र, मुंबईमध्ये देवनार कत्तलखान्यातून मांस घेऊन ते परवानाधारक मटणविक्रेत्यांच्या दुकानात विकले जाते. देवनार कत्तलखान्यात ‘झटका’ युनिट बंद आहे. इथे केवळ आता ‘हलाल’ युनिटच आहे. त्यामुळे हिंदू खाटिक दुकानदाराला देवनार कत्तलखान्यातील ‘हलाल’ पद्धतीचे मटण घेऊन तेच विकावे लागते. मुंबईतले ‘झटका’ युनिट सुरू करावे, अशी मागणी घेऊन आम्ही लवकरच नितेश राणे यांना भेटणार आहोत. तसेच, ‘झटका’ युनिट सुरू केले, तरीसुद्धा देवनार कत्तलखान्यात ‘व्यापारी असोसिएशन’ आणि ‘दलाल असोसिएशन’वर मुस्लिमांचे प्राबल्य आहे. त्यामुळे देवनार कत्तलखान्यात ‘झटका’ युनिट सुरू केले, तरीसुद्धा सर्वच पातळ्यांवर सुधारणा करावी लागेल.
गजेंद्र घोडके, मुंबई प्रदेश अध्यक्ष,
अखिल भारतीय खाटिक समाज संघटना
मुंबईकरांना ‘हलाल’ मटणाशिवाय
पर्यायच नाही...
राज्यातील इतर शहरांमध्ये समाजाला मटण विक्रीसाठी परवाना मिळतो. पण, मुंबईत परवानाधारक दुकानदारांना देवनार कत्तलखान्यातूनच मटण खरेदी करणे बंधनकारक आहे. देवनार कत्तलखान्यामध्ये दोन दशकापूर्वी मुंबई महानगरपालिकेने ‘झटका’ युनिट बंद केले. ‘झटका’ मटणाची मागणी जास्त नाही. तसेच, कर्मचारीवर्गही कमी आहे, असे महानगरपालिकेचे म्हणणे. ‘हलाल’ संदर्भात सगळे नियम पाळून देवनारमध्ये आता केवळ ‘हलाल’ पद्धतीनेच मटण मिळते. हे ‘हलाल’ मटण सगळ्या मुंबईच्या मार्केटमधील दुकानात येते. हिंदू म्हणून पारंपरिक संस्कृती श्रद्धा जपतात, त्यांनाही त्यांच्या श्रद्धेच्या विपरीत मुंबईमध्ये केवळ ‘हलाल’ मटणच विकत घ्यावे लागते.
‘मल्हार सर्टिफिकेट’ का हवे?
‘मल्हार सर्टिफिकेट’साठी चरश्रहरीउशीींळषळलरींळेप.लेा हे अधिकृत संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. येथे हिंदू व्यापार्यांना नोंदणी करावी लागेल. यानंतर ‘मल्हार सर्टिफिकेट’ देण्यात येईल. ‘मल्हार सर्टिफिकेटा’द्वारे हिंदू समुदायांकडून पारंपरिक ‘झटका’ पद्धती (पशूला वेदनादायी मरण न देता) वापरून मांस विकले जाणार आहे. हिंदू आणि शिखांसाठी ‘हलाल’ नसलेले मांस उपलब्ध करून दिले जाणार आहे. हिंदू धार्मिक परंपरेनुसार बकरी आणि मेंढीचे ताजे, स्वच्छ आणि इतर कोणत्याही प्राण्यांच्या मांसात मिसळलेले नसणार, याची खात्री करण्यात येणार आहे. याअंतर्गत विकले जाणारे हे मांस केवळ हिंदू खाटिक समुदायाच्या विक्रेत्यांकडून उपलब्ध केलेले असेल. ‘मल्हार सर्टिफिकेटा’च्या संकेतस्थळानुसार, काटेकोर हिंदू धार्मिक पद्धतींचे पालन करणार्या विक्रेत्यांना प्रोत्साहन दिले जाईल.
‘हलाल सर्टिफिकेट’ म्हणजे काय?
‘हलाल’ पद्धतीमध्ये पशू कापणारा व्यक्ती मुस्लीम असणे अनिवार्य आहे. त्याने अल्लाचे स्मरण करून पशूच्या माने खालून धारदार हत्यार फिरवायचे. ते हत्यार असे फिरवायचे की, पशू शुद्धीत असला पाहिजे. याला ‘जबहा’ म्हणतात. या पद्धतीने पशूच्या श्वासनलिका आणि रक्तवाहिन्या कापल्या जातात. परंतु, मागे असलेल्या मज्जारज्जूची यंत्रणा शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत असते. त्यामुळे रक्ताचा शेवटचा थेंब शरीरातून बाहेर पडेपर्यंत पशू जिवंत असतो आणि वेदना भोगत असतो. जेव्हा पशू पूर्णतः मृत होतो आणि सर्व गात्रे शिथिल होतात, तेव्हा डोके शरीरापासून वेगळे केले जाते आणि मासांचे तुकडे करण्याची प्रक्रिया पुढे पार पाडली जाते. शरीरातला एक एक अवयव रक्तविहीन होऊन तडफडून तो पशू मरतो. ही ‘हलाल’ पद्धत. यामध्ये पशूला बेशुद्ध करणेही हराम आहे. हे सगळे करताना पशू पूर्ण शुद्धीत राहील, याची खात्री केली जाते. या पद्धतीने मांस मिळवल्यानंतर पुढे नियमानुसार ‘हलाल सर्टिफिकेट’ देणार्या संस्थाकडून मांस विक्रीसाठी ‘हलाल’ प्रमाणपत्र मिळते.
‘हलाल’ अर्थव्यवस्थेची व्याप्ती
जगभरातील देशांमध्ये ‘हलाल सर्टिफिकेट’साठी त्या त्या देशातील सरकारी यंत्रणा कार्यरत आहे. मात्र, भारतात ‘हलाल सर्टिफिकेट’ सरकार देत नाही, तर खासगी संस्था देतात. भारतामध्ये ‘हलाल सर्टिफिकेट’ देणार्या काही प्रमुख कंपन्या-‘हलाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’, ‘हलाल सर्टिफिकेशन सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’, ‘जमात उलेमा ए महाराष्ट्र’ आणि ‘जमात उलेमा ए हिंद हलाल ट्रस्ट.’ केवळ मांसमटणाबाबतच ‘हलाल सर्टिफिकेट’ देत नाहीत, तर औषध, सौंदर्य प्रसाधने, बिस्कीट, केक इतर खाण्याचे पदार्थ, अगदी सिमेंट आणि लोखंडी वस्तूंसह बिसलेरी पाण्यावरही ‘हलाल सर्टिफिकेट’ दिले जाते. भारतात ‘हलाल’ व्यापारपेठेची उलाढाल आठ लाख कोटी इतकी आहे.