करुणा शर्मांचा धनंजय मुंडेंवर आरोप! आता आमदारकीही जाणार का? घरचा वाद न्यायालयात?
15-Mar-2025
Total Views | 16
बीड : करूणा शर्मा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांवर शनिवारी परळी न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, हे आरोप सिद्ध झाल्यास धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणूकीवेळी धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार करूणा शर्मा यांनी केली होती. त्यात करूणा शर्मा यांच्या दोन मुलांच्या नावांचा उल्लेख होता. परंतू. करूणा शर्मांच्या नावावरील संपत्तीबाबत कोणताही उल्लेख नसल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, आता याप्रकरणी परळीतील न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीत काय घडते? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने त्यांनी नुकताच आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता पुन्हा करूणा शर्मा यांचे आरोप सिद्ध झाल्यास झाल्यास त्यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.