मविआचे लोक आजही औरंगाबादला...; अतुल भातखळकर यांचा विरोधकांवर घणाघात
15-Mar-2025
Total Views | 10
मुंबई : महाविकास आघाडीतील लोक आजही औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर म्हणत नाही, असा घणाघात भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे. उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी औरंगजेबाची कबर हटवणे हा इतिहास संपवण्याचा प्रकार आहे, असे वक्तव्य केले होते. यावर भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले.
अतुल भातखळकर म्हणाले की, "महाविकास आघाडीतील लोक आजही औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर म्हणत नाहीत. अंबादास दानवे यांनी आधी त्यावर बोलावे आणि मगच आमच्यासारख्या अस्सल हिंदूत्ववादी लोकांना शिकवण्याचा प्रयत्न करावा. ज्या प्रकाश आंबेडकरांसोबत उबाठा गट महानगरपालिकेत युती करण्याची भाषा करतो त्याच प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या थडग्यावर फुले उधळली आहेत. याविषयी अंबादास दानवेंनी आधी भाष्य करावे आणि मगच भाजप आणि शिवसेनेसारख्या हिंदूत्ववादी पक्षावर बोलावे," असेही ते म्हणाले.