युनूसना हुकूमशहा म्हणत बांगलादेशी राजदूतने दिला घरचा आहेर

    14-Mar-2025
Total Views |

Bangladesh Ambassador Comment on Muhammad Yunus
Bangladesh Ambassador Comment on Muhammad Yunus

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :
पंतप्रधान शेख हसीना यांना पंतप्रधान पदावरून हटवून सत्तेत आलेल्या मोहम्मद युनूस यांच्याबद्दल त्यांच्यात सरकारमधील लोकांनी घरचा आहेर देण्यास सुरुवात केली आहे. शेख हसीना यांना दहशतवाद्यांच्या मदतीने सत्तेवरून कसे हटवण्यात आले आणि बांगलादेशातील हिंदूंची सध्या काय स्थिती आहे, हे मोरोक्कोमधील बांगलादेशच्या राजदूताने सांगितले आहे. त्यांनी युनूसला एकाअर्थी हुकूमशहा म्हटले आहे.

हे वाचलंत का? : रमजानच्या काळात मशिदीत झालेल्या स्फोटाने पाकिस्तान हादरले

मोरोक्कोमधील बांगलादेशचे राजदूत हारून अल रशीद यांनी बांगलादेशच्या युनुस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. बांगलादेश कुंडीत जात असून पाश्चिमात्य देश यावर मौन बाळगून आहेत, असे त्यांनी म्हटले. बांगलादेशमध्ये सत्ता मिळविण्यासाठी भारतविरोधी भावना निर्माण करण्यात आल्याचे रशीद यांनी म्हटले आहे. दि. ५ ऑगस्ट २०२४ रोजी बांगलादेशातील सत्तेत फेरबदल हा दहशतवादी मोहिमेचा परिणाम असल्याचा आरोप त्यांनी केलाय. याला जागतिक इतिहासातील सर्वात यशस्वी दहशतवादी कारवाया म्हटल्या जातील, असे रशीद यांचे म्हणणे आहे.

पुढे ते म्हणाले, ही दहशतवादी मोहीम काही लोकांनी हसीना सरकारविरोधात इंटरनेटवर अपप्रचार करून सुरू केली होती. शेख हसीना यांच्या राजवटीत भाषण स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन मुस्लिमांना भडकावण्यात आले आणि त्यांच्या मनात भारताविषयी द्वेष वाढला. याशिवाय हिंदूंविरुद्ध हिंसाचारही भडकावण्यात आला. शेख हसीनाचे सरकार पाडल्यानंतर युनूस सरकार अल्पसंख्याकांचा छळ करण्यात गुंतले आहे. मानवाधिकारांच्या उल्लंघनाची खरोखरच चौकशी झाली तर एक भयानक सत्य समोर येईल. युनूसच्या आश्रयाखाली अवघ्या १५ दिवसांत जे अत्याचार झाले ते शेख हसीना यांच्या संपूर्ण कार्यकाळात झालेल्या अत्याचारांपेक्षा जास्त होते.