बिजनौरमधील धामपूरात कट्टरपंथी युवकाने प्रभू श्री राम आणि सीतामाईबाबत ओकली गरळ

व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

    12-Mar-2025
Total Views | 10

Shri Ram
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील बिजनौरमधील धामपूरमध्ये एका कट्टरपंथी मुस्लिम समाजाच्या युवकाने प्रभू श्री राम आणि माता सीतेबाबत गरळ ओकत पायरी सोडली आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. शुक्रवारी दुपारी ही परिस्थिती पाहता ग्रामस्थांमध्ये संताप पसरला आहे. अनेक गावकऱ्यांनी पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
 
ग्रामस्थांनी आरोप केला होता की, या तरुणाचा यापूर्वी माराहाण प्रकरणात आणि विनयभंग प्रकरणात समावेश असल्याचा सांगितले जात आहे. संबंधित प्रकरणी आता पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. संबंधित आरोपी हा गाव प्रमुखाचा मुलगा आहे. शुक्रवारी दुपारी सिओहारा रस्त्यावरील कुंडीपुरा केदारपूर गावातील रहिवासी विशेष राजपूर, अरुण कुमार, आकाश राजपूर, प्रिन्स सुदीप, शैलेंद्र इत्यादींना पोलीस ठाण्यात हजेरी लावली.
 
राजपूत यांनी सांगितले की, तो संबंधित कट्टरपंथी पोलीस हा सकाळी ११ वाजता सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहत असताना सीता माता आणि प्रभू श्रीरामाबाबत गरळ ओकणारा व्हिडिओ त्यांच्या समोर आला. यामुळे आता गावकऱ्यांचा संताप शिगेला गेला आहे. यामुळे आता गावकऱ्यांनी पोलीस ठाणे गाठत तरुणांवर कारवाईची मागणी केली आहे.
 
 
 
ग्रामस्थांनी सांगितले की, आरोपी तरुणाने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटचे नाव हे आरिश डॉन, दहशतीचे दुसरे नाव...अशा अशयाचे ठेवण्यात आले होते. त्याने या अकाऊंटवरून त्याच्या स्टेट्सवरून व्हिडिओ अपलोड करण्यात आला. आरोपी युवक चोरी, मारामारी आणि विनयभंगाच्या अनेक प्रकरणांमध्ये सहभागी आहे.
 
संबंधित प्रकरणी कोतवाली प्रभारी राजेश सिंह म्हणतात की, तक्रारीच्या आधारे आरोपी आरिफवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी २ मार्चच्या रात्री त्याच गावात बेकायदेशीरपणे मदरसा चालवून लाऊडस्पीकरवर नमाज पठण केल्याचे प्रकरण समोर आले होते. ज्यात पोलिसांनी कारवाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा