बांगलादेशी घुसखोऱ्यांचा पोलीस लावणार सोक्षमोक्ष, मोहिमेअंतर्गत २० हून अधिक अटक
12-Mar-2025
Total Views | 15
नवी दिल्ली : भारतातील विविध राज्यांमध्ये अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींविरोधात (Bangladeshi) मोठ्या प्रमाणात मोहिम राबविण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांना यामागे आता मोठं यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांनी एका कारवाईदरम्यान, २० हून अधिक बांगलादेशींना अटक केली आहे. संबंधित घुसखोरांना पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. पकडण्यात आलेले बांगलादेशी हे अवैधपणे भारतात आले होते. त्यांच्याकडून अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, तसेच दिल्लीचे गृहमंत्री आशिष सूद, पोलीस आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. अवैधपणे भारतात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींना बनावट कागदपत्रे बनवण्यासाठी मदत करणाऱ्यांवर कटक कारवाई केली पाहिजे आणि त्यांना ओळखून हद्दपार केली पाहिजे. सातत्याने खराब कामगिरी करणाऱ्या पोलीस ठाणे आणि उपविभागांवर कठोर कारवाई केली पाहिजे.
— Republic Bharat - रिपब्लिक भारत (@Republic_Bharat) March 12, 2025
भारत-नेपाळ सीमेवर महाराजगंज जिल्ह्यात व्हिसा आणि पासपोर्टशिवाय प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. सीमा सुरक्षा दलाने मंगळवारी याबाबत माहिती दिली होती. या प्रकरणात बांगलादेशी घुसखोरी करणारा सैफुल इस्लाम याला निचलौल परिसरात एसएसबीने अटक केली आहे. तेव्हा आसाममध्ये चार बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यात आले आणि त्यांना शेजारच्या देशात परत पाठवण्यात आले. सोमवारी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी चार बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली. त्यांना सीमेपलीकडे परत पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, बांगलादेशींची भारतात होणारी अवैधपणे घुसखोरी ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा बांगलादेशींनी भारतात घुसखोरी केली आहे. काही बांगलादेशी घुसखोरी करणारे लोक हे देशभरातील विविध राज्यात अवैध कागदपत्रांचा वापर करत वास्तव्य करत आहेत.यामागील नेमके कारण काय असावे? हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.