कल्याण परिसरात हिंदूंना लक्ष्य करण्याची पहिलीच वेळ नाही

    11-Mar-2025
Total Views |

Kachore in Kalyan to create a mini Pakistan

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Kachore Mini Pakistan) 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वातंत्र्यवीर नगर, कल्याण पूर्व येथील कचोरे गावच्या बाल शाखेवर दगडफेक झाल्याने संपूर्ण परिसरात संतप्त वातावरण तयार झाले आहे. इस्लामिक विचारसरणी असलेल्या पाचही आरोपींना टिळक नगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. यापैकी चार आरोपी अल्पवयीन असल्याचा दावा करण्यात येतोय. त्यामुळे यातील सत्यता उलगडण्याकरीता आरोपींच्या वैद्यकीय तपासणीबाबत सध्या मागणी होतेय. इतकेच नव्हे तर, कचोरे भागातील धर्मांधांना याभागास मिनीपाकिस्तान करायचे असल्याचा संशयही व्यक्त केला जातोय.

हे वाचलंत का? : दिल्लीतील सीएएविरोधी दंगलीचा म्होरक्या शर्जिल इमामच

गंभीर बाब म्हणजे, कचोरे भागातील धर्मांधांनी असे कृत्य करायची ही पहिली वेळ नाही. मिळालेल्या माहितीनुसार हिंदूंचे सण आले की, दोन गटांत तणाव निर्माण करायचा प्रयत्न कचोरे भागातील धर्मांधांकडून केला जातो. हिंदूंनी आपला परिसर सोडून जावा, अशी त्यांची इच्छा आहे. वास्तविक दुर्गाडी किल्ला नजीक झालेल्या नवीन रस्त्याच्या बांधकामामुळे गोविंदवाडी परिसरातील अल्पसंख्याकांना २०१५ दरम्यान कचोरे भागात राहण्यास घरे दिली होती. तेव्हापासून या परिसरात त्यांची वस्ती वाढत गेली. हिंदूंचे सण आले की त्यास गालबोट लावण्याचा प्रयत्न धर्मांधांकडून होतो.

म्हणजेच मीरा-भाईंदर परिसरातील नयानगर किंवा रत्नागिरीतील कोकण नगर परिसराप्रमाणे कचोरे भाग देखील मिनिपाकिस्तान बनवून हिंदूंना किंवा संघ स्वयंसेवकांना लक्ष्य करण्याता धर्मांधांचा डाव असल्याचा असा संशय स्थानिकांकडून व्यक्त होतो आहे. मंगळवार, दि.११ मार्च रोजी दगडफेक करणाऱ्या आरोपींना कोर्टात हजर केले असता, त्यांना गुरुवार पर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.
 
४ नगरांचे सांघिक, २०० स्वयंसेवक सदंड उपस्थित
चौधरीवाड्यातील मोकळ्या मैदानात लागणाऱ्या संयुक्त शाखेवर झालेली दगडफेकीची घटना संतापजनकच होती. ज्या संघस्थानावर धर्मांधांनी दगडफेक केली, त्याच स्थानावर नंतर एकूण ४ नगरांचे सांघिक झाले. यावेळी एकूण २०० स्वयंसेवक सदंड उपस्थित होते. दरम्यान व्यायाम, दंड प्रहार, खेळ असे विविध शारीरिक कार्यक्रम घेण्यात आले.

भोंगे चालतात... घंटानाद का नाही?
गेल्या २०१५ पासून कचोरे भागात धर्मांधांचा उन्माद वाढला आहे. हिंदूंचे सण आले की, त्यास गालबोट लावायचा प्रयत्न धर्मांधांकडून होतो. गणपतीमध्ये विसर्जन मिरवणूक काढून देण्यास विरोध केला जातो, सोसायटीची पूजा असल्यास मोठ्या आवाजात आरती म्हणायची नाही, मंदिरात घंटानाद करायचा नाही, असे सांगून धमकवले जाते. जर तुम्हाला मशिदींवरचे भोंगे चालत असतील तर मंदिरातला घंटानाद का नाही? याचा अर्थ धर्मांधाना करोचे भाग मिनिपाकिस्तान करायचा आहे, हे निश्चित.
- रेखा चौधरी, भाजप माजी नगरसेविका, कचोरे प्रभाग

 
 
अग्रलेख
जरुर वाचा
अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना नाना पटोले यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर

अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना नाना पटोले यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर

Nana Patole उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी १० मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर खुर्च्यांच्या अदलाबदलीवरून चर्चाही झाल्या. त्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. आमच्याकडे या आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, असे नाना पटोले म्हणाले. यामुळे आता राज्याच्या राजकीय परिस्थितीत उलथापालथ ..

जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

सरकारी व्यवस्थेतील उणीवांचा लाभ घेत जन्म-मृत्यू नोंदणीची प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हैदोसावर आता अंकुश बसणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. १२ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन करून, विलंबाने करावयाच्या जन्म-मृत्यू नोंदीबाबतच्या कार्यपध्दतीनिश्चित केल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आजपासूनच महाराष्ट्रात नवीन बदल लागू होतील, अशी घोषणा केली...

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

होळी म्हणजे रंगांचा उत्सव. एका पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नी जाळू शकणार नाही असा वर मिळाला होता. हिरण्यकशपूने होलिकेला सांगितले की प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीवर बसावेस म्हणजे प्रल्हाद जळून मरेल आणि होलिका मात्र जिवंत राहील. हिरण्यकशपूचा सल्ला तिने ऐकला. परंतू प्रल्हादाने नारायणाचे नामस्मरण केल्याने होलिका जळून गेली आणि प्रल्हाद जिवंत राहिला या आनंदाप्रीत्यर्थ दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली होलिकादहन केलं जाते. तसेच यावेळी दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा अशी प्रार्थना ..