उबाठा गटाला गळती सुरूच...

कळवा शाखाप्रमुखांसह शिवसैनिक भाजपच्या गोटात

    10-Mar-2025
Total Views | 20

UBT group in thane 
 
 
ठाणे: ( UBT group in thane ) शिवसेना उबाठा गटाच्या कळवा येथील शाखाप्रमुख ज्ञानेश्वर जमदाडे यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी भाजपाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली कामगार मोर्चाचे ठाणे जिल्हाध्यक्ष राकेश चौघुले यांनी पक्षप्रवेशासाठी पुढाकार घेतला होता.
 
भाजपाच्या ठाणे विभागीय कार्यालयात भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात उबाठा गटातील शाखाप्रमुख ज्ञानेश्वर भानुदास जमदाडे व कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. या कार्यकर्त्यांची भाजपा संघटनेत विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या योजना सामान्यांपर्यंत पोचवाव्यात. तसेच ठाणे शहर जिल्ह्यात भाजपाला क्रमांक १ चा पक्ष करण्याचा निर्धार करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर कामगार मोर्चाच्या माध्यमातून शहरातील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कटीबद्ध राहणार असल्याचा संकल्प करण्यात आला.
 
या कार्यक्रमाला माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण, जिल्हा सरचिटणीस सचिन पाटील, समीरा भारती, भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण, जिल्हा अनुसूचित जमाती मोर्चाच्या शहराध्यक्ष नताशा सोनकर, कोपरी मंडलचे अध्यक्ष शिवाजी रासकर, कळवा मंडलचे अध्यक्ष सुदर्शन साळवी, कामगार मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस भगवान आडे आदिसह मान्यवर उपस्थित होते.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मराठी चित्रपटसृष्टिला धर्मा प्रॉडक्शनचं पाठबळ; ये रे ये रे पैसा ३

मराठी चित्रपटसृष्टिला धर्मा प्रॉडक्शनचं पाठबळ; ये रे ये रे पैसा ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित!

ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर, हिट मराठी कॉमेडी फ्रँचायझी तिसऱ्या भागासह परतली आहे.ये रे ये रे पैसा ३ अखेर येत आहे. यावेळी, निर्माते आणखी गोंधळ आणि मनोरंजनाचे आश्वासन देत आहेत. संजय जाधव हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत, तर त्यांनी आणि अरविंद जगताप यांनी एकत्रितपणे पटकथा लिहिली आहे. तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, आनंद इंगळे, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, वनिता खरात, नागेश भोंसले आणि विशाखा सुभेदार या कलाकारांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. धर्मा प्रॉडक्शन्स ..