कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडीत जल्लोषात बैलगाडा शर्यत
10-Mar-2025
Total Views | 7
1
कल्याण: ( Kapil Patil birthday ) माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने भिवंडी तालुक्यातील इताडे येथे भव्य बैलगाडा बिनजोड शर्यत पार पडली. या शर्यतीत २५० हून अधिक बैलगाडे सहभागी झाले होते. हजारो ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या शर्यतीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी बैलगाडा चालवून शर्यतीचा अनुभव घेतला. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पाटील उपस्थित होते. इताडे येथील सरपंच जगन पाटील यांनी स्पर्धेचे नियोजन केले होते.
बैलगाडा म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची एक संस्कृती व एक परंपराच आहे. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी हजारो ग्रामस्थांमध्ये उत्सूकता असते. त्याचा प्रत्यय भिवंडीत आला. इताडे येथे झालेल्या भव्य बैलगाडा बिनजोड शर्यतीला मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी हजारो आबाल वृद्ध नागरिकांचा जल्लोष, उत्साह आणि बैलांच्या जोडीवरील शेतकऱ्यांचे प्रेम पाहावयास मिळत होते.