The Prayer Short Film : विश्वास की परिस्थिती ? 'द प्रेयर' उलगडणार मानवी मनाची अवस्था!

    04-Feb-2025
Total Views | 39



makrand deshpande
मुंबई : प्रार्थना हा आत्म्याचा आवाज असतो. जेव्हा प्रार्थना पूर्णत्वास येते तेव्हा तो विश्वास असतो की ती परिस्थिती असते? हे प्रत्येक जण आपापले ठरवतो. अशाच संकल्पनेवर आधारित ''द प्रेयर' ही हिंदी शॉर्टफिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मॅक वर्ल्ड फिल्म्स प्रस्तुत या शॉर्टफिल्मचे निर्माते मकरंद देशपांडे असून ते प्रथमच शॉर्टफिल्मची निर्मिती करत आहेत. निवेदिता पोहनकर लिखित, दिग्दर्शित या शॉर्टफिल्ममध्ये अदिती पोहनकर, मकरंद देशपांडे, स्मिता जयकर, संदीप धाबाळे, सुशांत जाधव, सोहिनी नियोगी, साहिल खान, श्रुती श्रीवास्तव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. १४ मिनिटांचीद  ही शॉर्टफिल्म हिंदी आणि इंग्रजी मध्ये प्रदर्शित होणार आहे.
''द प्रेयर' ही एका हृदयस्पर्शी प्रसंगावर आधारित कथा आहे. प्रार्थना केल्याने गोष्टी सुरळीत होतात का? की परिस्थिती हे सगळे घडवून आणते? हा विचार करायला लावणारी ही शॉर्टफिल्म असून 'द प्रेयर'मधील संवेदनशील कथा आणि कलाकारांच्या दमदार अभिनयाने ही शॉर्टफिल्म नक्कीच प्रेक्षकांना भावेल. अमित रॉय या शॉर्टफिल्मचे डिओपी असून दीपा भाटिया आयुष सपरा यांनी संकलन केले आहे. या सगळ्याला पूरक ठरणारे टबी यांचे भावनिकदृष्ट्या प्रभावी संगीत या शॉर्टफिल्मचा प्रभाव अधिकच गडद करते.
निवेदिता पोहनकर म्हणतात, 'विश्वास ही एक अशी स्थिती आहे. जी असते किंवा नसते. 'द प्रेयर' ही मानवी मनाच्या या दोन अवस्था उलगडण्याचा प्रयत्न करणारी शॉर्टफिल्म आहे. जेव्हा एखादी व्यक्ती संकटात सापडते, तेव्हा मन भांबावून जाते, पळ काढते. परंतु ज्या क्षणी मन शांत होते, त्या क्षणी अंतःकरणाचा स्पष्ट, अढळ आवाज आपल्याला योग्य दिशा दाखवतो आणि उचित कृतीसाठी मार्गदर्शन करतो. प्रार्थनेवर केवळ विश्वास असणे गरजेचे आहे. हेच आम्ही या १४ मिनिटे ४९ सेकंदातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.''
निर्माते मकरंद देशपांडे म्हणतात, " मी प्रथमच शॉर्टफिल्मची निर्मिती करत आहे आणि पहिल्याच वेळी एक उत्तम आणि सखोल आशय असलेल्या कथेचा भाग होणे, हे नक्कीच सुखावह आहे. टीम अप्रतिम आहे. मी निवेदिता पोहनकरचे विशेष कौतुक करेन, तिने एक संवेदनशील, नाजूक विषय अतिशय प्रगल्भतेने हाताळला आहे. ही शॉर्टफिल्म प्रेक्षकांना एक नवीन अनुभव देईल, याची आम्हाला खात्री आहे."



अग्रलेख
जरुर वाचा
जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

सरकारी व्यवस्थेतील उणीवांचा लाभ घेत जन्म-मृत्यू नोंदणीची प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हैदोसावर आता अंकुश बसणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. १२ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन करून, विलंबाने करावयाच्या जन्म-मृत्यू नोंदीबाबतच्या कार्यपध्दतीनिश्चित केल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आजपासूनच महाराष्ट्रात नवीन बदल लागू होतील, अशी घोषणा केली...

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

होळी म्हणजे रंगांचा उत्सव. एका पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नी जाळू शकणार नाही असा वर मिळाला होता. हिरण्यकशपूने होलिकेला सांगितले की प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीवर बसावेस म्हणजे प्रल्हाद जळून मरेल आणि होलिका मात्र जिवंत राहील. हिरण्यकशपूचा सल्ला तिने ऐकला. परंतू प्रल्हादाने नारायणाचे नामस्मरण केल्याने होलिका जळून गेली आणि प्रल्हाद जिवंत राहिला या आनंदाप्रीत्यर्थ दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली होलिकादहन केलं जाते. तसेच यावेळी दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा अशी प्रार्थना ..

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

(Tamil Nadu drops official Rupee Symbol from State Budget) तामिळनाडूमधील एमके स्टॅलिन यांचे सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भाषेच्या मुद्द्यावर तणावाचे वातावरण आहे. यात आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (M K Stalin) यांच्या निर्णयामुळे हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. तामिळनाडू सरकारने राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये रुपयाच्या चिन्हाऐवजी (₹) तमिळ भाषेतील रुबई मधील पहिले अक्षर ‘रु’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे...