आलोक नाथ आणि श्रेयस तळपदे यांच्यावर ९ कोटींच्या आर्थिक घोटाळ्याचा आरोप!

    03-Feb-2025
Total Views | 60


shreyas talpade


मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते आलोक नाथ आणि श्रेयस तळपदे यांच्या विरोधात गुंतवणुकदारांची फसवणुक केल्याचा गंभीर आरोप लावण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील लखनौच्या गोमती नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात केवळ दोन्ही अभिनेतेच नव्हे, तर क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या काही अधिकाऱ्यांचीही नावे आहेत. या प्रकरणात ४५ गुंतवणूकदारांची तब्बल ९ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. या तक्रारीनुसार, आलोक नाथ आणि श्रेयस तळपदे हे "ह्युमन वेल्फेअर क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड" या संस्थेचे ब्रँड ॲम्बॅसिडर होते. त्यांच्या नावामुळे अनेक गुंतवणूकदार या योजनेत सहभागी झाले. सुरुवातीला या संस्थेने ठेवीदारांना वेळेवर परतावा दिला, त्यामुळे लोकांचा संस्थेवरील विश्वास वाढला. मात्र, २०२३ मध्ये परताव्याच्या रकमा द्यायला सुरूवात झाली नाही आणि संस्थेने विविध सबबी सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केली.
हे प्रकरण केवळ उत्तर प्रदेशपुरते मर्यादित नाही. याआधी हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातही या घोटाळ्याशी संबंधित एक एफआयआर दाखल करण्यात आली होती. तेथील तक्रारदार विपुल अँटिल (३७) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही संस्था गुंतवणूकदारांना उच्च परताव्याचे आश्वासन देत होती. तसेच, या संस्थेने मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी करून लोकांना आकर्षित केले. तक्रारीनुसार, "ह्युमन वेल्फेअर क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी" ही संस्था मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट अंतर्गत १६ सप्टेंबर २०१६ पासून कार्यरत होती. संस्थेने फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) आणि रिकरिंग डिपॉझिट (आरडी) यांसारख्या विविध गुंतवणूक योजना आणल्या होत्या. त्यात मोठ्या प्रमाणावर लोकांनी पैसे गुंतवले.
पोलिसांकडून सखोल तपास सुरू :

सोनीपत आणि लखनौ पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून संस्थेच्या अधिकाऱ्यांवर तसेच ब्रँड ॲम्बॅसिडर राहिलेल्या अभिनेत्यांवर कोणती भूमिका बजावली याचा तपास केला जात आहे. हा गुंतवणूक घोटाळा मोठ्या प्रमाणावर झाल्याने या प्रकरणात अनेक लोकांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. यामध्ये कंपनीचे उच्च पदस्थ अधिकारी, एजंट तसेच अन्य प्रसिद्ध व्यक्तीही सामील असू शकतात. या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या नव्या भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत कलम ३१६ (२), ३१८ (२) आणि ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमांतर्गत फसवणूक आणि विश्वासघातासारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे.
सरकारकडून गुंतवणूकदारांना सतर्क राहण्याचे आवाहन :

या प्रकरणामुळे गुंतवणूकदारांनी कोणत्याही आकर्षक परताव्याच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी योग्य कागदपत्रांची तपासणी करणे आणि अधिकृत संस्थांशी संपर्क साधणे गरजेचे आहे, असे पोलिसांनी सांगितले.



अग्रलेख
जरुर वाचा
जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

सरकारी व्यवस्थेतील उणीवांचा लाभ घेत जन्म-मृत्यू नोंदणीची प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हैदोसावर आता अंकुश बसणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. १२ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन करून, विलंबाने करावयाच्या जन्म-मृत्यू नोंदीबाबतच्या कार्यपध्दतीनिश्चित केल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आजपासूनच महाराष्ट्रात नवीन बदल लागू होतील, अशी घोषणा केली...

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

होळी म्हणजे रंगांचा उत्सव. एका पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नी जाळू शकणार नाही असा वर मिळाला होता. हिरण्यकशपूने होलिकेला सांगितले की प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीवर बसावेस म्हणजे प्रल्हाद जळून मरेल आणि होलिका मात्र जिवंत राहील. हिरण्यकशपूचा सल्ला तिने ऐकला. परंतू प्रल्हादाने नारायणाचे नामस्मरण केल्याने होलिका जळून गेली आणि प्रल्हाद जिवंत राहिला या आनंदाप्रीत्यर्थ दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली होलिकादहन केलं जाते. तसेच यावेळी दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा अशी प्रार्थना ..

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

(Tamil Nadu drops official Rupee Symbol from State Budget) तामिळनाडूमधील एमके स्टॅलिन यांचे सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भाषेच्या मुद्द्यावर तणावाचे वातावरण आहे. यात आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (M K Stalin) यांच्या निर्णयामुळे हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. तामिळनाडू सरकारने राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये रुपयाच्या चिन्हाऐवजी (₹) तमिळ भाषेतील रुबई मधील पहिले अक्षर ‘रु’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे...