मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Santishree Pandit on Pune University) "जेएनयूपेक्षा पुणे विद्यापीठ अधिक डाव्या विचारांचे आहे. मी या विद्यापीठात काम केलंय. तेथे शिकल्यावर कुठेही राजकारण करता येईल. त्याजोरावरच मी जेएनयूमध्ये चांगले काम करू शकले.", असे म्हणत जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्लीच्या कुलगुरु प्रा. डॉ. शांतिश्री पंडित यांनी पुणे विद्यापीठाला आरसा दाखवला आहे. गुरुवार, दि. १३ फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या 'महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी' आयोजित आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्मृती व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. 'नव्या युगातील भारतीय समाज : संधी आणि आव्हाने' या विषयाला धरून त्यांनी उपस्थितांना संबोधले.
हे वाचलंत का? : आचार्य सत्येंद्रदास यांना शरयू नदीत दिली 'जलसमाधी'
डाव्यांच्या राजकारणावर बोलताना त्या पुढे म्हणाल्या, आजवर डावे लोकच क्रांतिकारी असू शकतात आणि त्यांचेच कथन अतिशय मजबूत आहे, असं आजपर्यंत पुढे आणण्यात आलं. परंतु वासुदेव बळवंत फडकेही क्रांतिकारक होते, हे समाजासमोर आणलं पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर हयात असेपर्यंत त्यांना ज्या प्रकारची वागणूक देण्यात आली, तो एका महान व्यक्तिमत्वाचा अपमान होता. आपल्या क्रांतिकारकांचा आपण सन्मान राखला पाहिजे. हिंदू बहुसंख्याक आहे तोपर्यंत भारत धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही देश राहणार आहे."
होय! मी संघाची आहे...
जेएनयूमध्ये आजपर्यंत एकही स्त्री कुलगुरू झालेली नाही. ही परंपरा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बदलली. नारीशक्ती संकल्पनेबाबत त्यांची जी संकल्पना आहे, ती त्यांनी प्रत्यक्षात उतरवून दाखवली. 'जेएनयू'ने आज आयआयएम, आयआयटीसारख्या संस्थांनाही क्रमवारीत मागे टाकले आहे. पण, मी उघडपणे सांगते, 'जेएनयू'ला सर्वोत्तम शैक्षणिक क्रमवारी मिळवून देणारी मी 'संघाची' आहे, असे ठामपणे शांतिश्री पंडीत यांनी सांगितले.
अभिव्यक्तीच्या नावाखाली हिंदूद्वेष कम्युनिस्टांचा डाव
पुणे विद्यापीठाच्या ललीत कला केंद्र येथील ओपन थिएटर येथे दि. ०२ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या एका नाटकाच्या प्रयोगातूनही हिंदूद्वेष उघडपणे दिसून आला होता. रामायण विषयावरील नाटक सादर करताना हिंदू धर्माच्या भावना दुखावणारे कृत्य कलाकारांनी उघडउघडपणे केले होते. प्रभू श्रीराम व सीतामातेच्या तोंडी शिव्या आणि आक्षेपार्ह संवाद नाटकाच्या लेखकाने लिहिला होता. तरी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी त्वरित नाटक बंद पाडले. 'जब वी मेट' या नावाची ती ही संहिता होती.