राष्ट्रग्रंथ आधारस्तंभ लोकशाहीचा...

    29-Jan-2025
Total Views | 26

rashtragranth
 
संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने लेखक प्रसाद थोरवे आणि अभिराम भडकमकर यांनी ‘आर्टिस्टिक ह्यूमन्स’ या दर्शन महाजन यांच्या निर्मिती संस्थेच्यावतीने कुमार सोहोनी दिग्दर्शित ‘राष्ट्रग्रंथ नामक भारतीय संविधान’ या अत्यंत संवेदनशील व महत्त्वाच्या विषयावरील नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग मुंबईत प्रजासत्ताक दिनी पार पडला. या नाटकात संविधान निर्मितीची आवश्यकता, निर्मितीची प्रक्रिया, त्यामध्ये घडलेल्या चर्चा या सर्वांचा उहापोह केला आहे. त्यानिमित्ताने नाटकाविषयी...
 
दि. २६ जानेवारी २०२५ रोजी देशात संविधान लागू होऊन ७५ वर्षे पूर्ण झाली. याचेच औचित्य साधून ‘राष्ट्रग्रंथ नामक भारतीय संविधान’ या अत्यंत संवेदनशील व महत्त्वाच्या विषयावरील नाटकाचा यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे सकाळी ११ वाजता शुभारंभाचा प्रयोग पार पडला. ‘आर्टिस्टिक ह्युमन्स’ संस्थेतर्फे दर्शन महाजन यांनी या नाटकाची निर्मिती केली. मिलिंद जोशी यांची गीते व संगीत असलेल्या या नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे यांनी केले. चैत्राली डोंगरे यांनी या नाटकाच्या वेशभूषेचे काम केले आहे. भारतीय संविधान व कायद्यांची निर्मितीप्रक्रिया व त्यापाठीमागील संविधानकारांची भूमिका, समान नागरी कायद्याबद्दलचे मत, ‘कलम ३७०’ पासून तीन तलाक अशा सामान्य माणसाच्या मनातील असंख्य प्रश्नांना या नाटकाने वाचा फोडली आहे. शाहबानो, ’केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार’ असे ऐतिहासिक खटले, ज्यावर अजूनपर्यंत कुणीही कलाकृती केलेली नाही, अशा ज्वलंत प्रश्नांना लेखक प्रसाद थोरवे व अभिराम भडकमकर यांनी हात घातला आहे. तसेच ’संविधान बदल की सुधार’? हे स्पष्ट करून ’राष्ट्रग्रंथ’ नाटकाने ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवू पाहणार्यांना चोख उत्तर दिलेले आहे. मराठी रंगभूमीवरील ‘संविधान’ या विषयावरील हे पहिले नाटक. शोषित, वंचित, स्त्रिया, कामगार, तृतीयपंथी अशा घटकांसह संपूर्ण देशवासीयांना जगण्याचा कसा अधिकार दिला, याचे उत्तम मंथन केले आहे. प्रेक्षकांनी नाटकाला उत्तम प्रतिसाद दिला. विषय गंभीर असला, तरी अत्यंत सध्या, सोप्या पद्धतीने मांडल्यामुळे प्रेक्षक शेवटपर्यंत खुर्चीला खिळून बसले होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून संविधानावर प्रकल्प दिला जाते आणि प्रकल्प पूर्ण करण्याच्या उद्देशाने मुले संविधानाची माहिती घेत जातात व शेवटी संविधान हा कंटाळवाणा विषय नसून, तो अत्यंत रंजक विषय असल्याचे त्यांना जाणवते. केरळ, बंगाली, उत्तर भारतीय, गुजराती अशा बहुभाषिक उभ्या भारतीय संस्कृतीचे दर्शन या नाटकातून मांडले आहे. तसेच, संविधानाची गौरवगाथा सांगणारे हे नाटक प्रत्येकाने पाहायला हवे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर या नाटकाला आवर्जून उपस्थित राहिले व नाटकाला शुभेच्छा देताना ‘राष्ट्रग्रंथा’चे त्यांनी तोंडभरून कौतुक केले.
 
‘इंडिया इज नॉट अ नेशन, इट्स पॉप्युलेशन’ असे म्हणत, भारतीयांना स्वातंत्र्य देणे चुकीचे ठरेल व काही दिवसांतच त्यांची १०० शकले होतील,’ असे भाकीत विन्स्टन चर्चिलसारख्या उद्दाम ब्रिटिश नेत्याने केले होते. शेकडो कोटी लोकसंख्येच्या देशात असलेली विविधता ही अनेक कारणांनी जरी भिन्न असली, तरीसुद्धा ती भारतीय संविधानाने एकसंघात आणली गेली आहे. इतिहासात अनेक परकीय आक्रमणे भारतात घडून गेली आहेत. प्रांत, भाषा, सीमा अशा सर्व वादांना डावलून भारतीयांनी अशा प्रसंगी सामूहिक लढा दिला. स्वतंत्र भारतानंतरदेखील भारतात असलेल्या विविधतेतली एकता, जी भारतीय संविधानाने एकसंघात जोडली आहे, त्या संविधानाबद्दलचे नेमके महत्त्व काय? संविधान हे केवळ आरक्षण चौकटी इतकेच सीमित आहे, असा गैरसमज आणि संभ्रम ‘राष्ट्रग्रंथ’ आधारस्तंभ लोकशाहीचा’ या नाटकातून खोडला आहे. दोन अंकी असलेले राष्ट्रग्रंथ नाटक हे संविधानाच्या व्यापक स्वरूपाचे दर्शन घडवते. समाजातील दुर्बल आणि शोषित घटकांना संरक्षण कवच म्हणून काम करणारे हे संविधान कसे लागू केले गेले, याचाही धांडोळा या नाटकात घेतला गेला आहे.
 
समाजातील सर्व वर्ग म्हणजे कामगार, आदिवासी, दलित, शोषित, स्त्री, बालके, ग्राहक इत्यादी असंख्य घटकांना आपले संविधान सुरक्षिततेची आणि न्यायाची हमी देते, हे पटवून देताना वास्तवात घडलेल्या ऐतिहासिक घटनांचे सादरीकरण यातून केले आहे. या नाटकाचे सादरीकरण करताना ऐतिहासिक गोष्टींची दखल घेत समाजमाध्यमांतील कुणाच्या भावनांना त्रास होणार नाही, यासाठी विशेष काळजी घेतली आहे. नाटकातील प्रत्येक कलाकाराने दोन ते तीन पात्र साकारुन ते अगदी व्यवस्थितरित्या पार पाडले आहेत. ज्या संविधानाने सामान्य नागरिकांना विशेष हक्क पुरवले आहेत. परंतु, ते नेमके उपयोगात कसे आणायला हवे, यासाठी सर्व देशप्रेमी व संविधानाचा आदर करणार्या नागरिकांना या नाटकाच्या प्रयोगात उपस्थित राहणे उपयोगी ठरेल. नाटकाद्वारे संविधानाचे महत्त्व देशभरात पोहोचायला हवे, यासाठी देशातील इतर राज्यातदेखील हिंदी भाषेसह अन्य भाषेच्या माध्यमातून या नाटकाचे प्रयोग सादर केले जाणार आहेत.
 
सागर देवरे 
 
९९६७०२०३६४
अग्रलेख
जरुर वाचा
जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

सरकारी व्यवस्थेतील उणीवांचा लाभ घेत जन्म-मृत्यू नोंदणीची प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हैदोसावर आता अंकुश बसणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. १२ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन करून, विलंबाने करावयाच्या जन्म-मृत्यू नोंदीबाबतच्या कार्यपध्दतीनिश्चित केल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आजपासूनच महाराष्ट्रात नवीन बदल लागू होतील, अशी घोषणा केली...

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

होळी म्हणजे रंगांचा उत्सव. एका पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नी जाळू शकणार नाही असा वर मिळाला होता. हिरण्यकशपूने होलिकेला सांगितले की प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीवर बसावेस म्हणजे प्रल्हाद जळून मरेल आणि होलिका मात्र जिवंत राहील. हिरण्यकशपूचा सल्ला तिने ऐकला. परंतू प्रल्हादाने नारायणाचे नामस्मरण केल्याने होलिका जळून गेली आणि प्रल्हाद जिवंत राहिला या आनंदाप्रीत्यर्थ दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली होलिकादहन केलं जाते. तसेच यावेळी दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा अशी प्रार्थना ..

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

(Tamil Nadu drops official Rupee Symbol from State Budget) तामिळनाडूमधील एमके स्टॅलिन यांचे सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भाषेच्या मुद्द्यावर तणावाचे वातावरण आहे. यात आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (M K Stalin) यांच्या निर्णयामुळे हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. तामिळनाडू सरकारने राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये रुपयाच्या चिन्हाऐवजी (₹) तमिळ भाषेतील रुबई मधील पहिले अक्षर ‘रु’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे...