राज्यभर अहिल्याभवन उभारण्याच्या कार्यवाहीला गती द्यावी

मंत्री आदिती तटकरे : ५ हजार महिलांना लवकरच रिक्षा वाटप करणार

    29-Jan-2025
Total Views | 48
 
Aditi Tatkare
 
मुंबई : राज्यभर अहिल्याभवन उभारण्यासाठीच्या प्रक्रियेस गती देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बुधवार, २९ जानेवारी रोजी दिले.
 
महिला व बालविकास विभागामार्फत सुरू असलेल्या विविध योजनांचा त्यांनी मंत्रालयात आढावा घेतला. यावेळी विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, आयुक्त कैलास पगारे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
 
हे वाचलंत का? -  मुंबई महानगर क्षेत्रात अधिकच्या परिवहन सेवेचे पर्याय निर्माण करा
 
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, "महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी तसेच सबलीकरणासाठी अहिल्या भवनाच्या माध्यमातून महत्वाचे काम सुरू होणार आहे. राज्यातील १८ जिल्ह्यात अहिल्याभवनचे काम सुरू असून उर्वरित जिल्ह्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी अहिल्याभवन उभारण्याच्या प्रक्रियेस गती देण्यात यावी. प्रत्येक जिल्ह्यात उभारण्यात येणारे हे अहिल्याभवन महिला, बालक आणि दिव्यांगांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी सज्ज असून अहिल्याभवन उभारण्यासंदर्भातील पायाभूत सुविधा उभाराव्या," असे निर्देश त्यांनी दिले. तसेच लवकरच ४ जिल्ह्यातील अहिल्याभवनचे लोकार्पण करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
 
५ हजार महिलांना 'पिंक ई-रिक्षा' वाटप करणार
 
"महिला व मुलींना रोजगार मिळावा, त्यांचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन व्हावे तसेच त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी राबविण्यात येणाऱ्या 'पिंक ई-रिक्षा'च्या योजनेसंदर्भात तातडीने कार्यवाही करावी. या योजनेअंतर्गत प्राप्त अर्जांपैकी ५ हजार पात्र महिलांना लवकरच रिक्षाचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच रस्त्यावर राहणार्‍या मुलांना शिक्षणाच्या आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फिरते पथक कार्यरत आहे. या पथकाच्या माध्यमातून आतापर्यंत विभागाने ३ हजार पेक्षा जास्त मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. प्रायोगिक तत्वावर सुरू असलेल्या हा उपक्रम व्यापक स्वरूपात सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी," अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
 
गरजू महिलांच्या मुलांसाठी पाळणाघर सुरू करण्यात येणार
 
"नोकरी करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी पाळणाघर आवश्यक असून गरजू महिलांच्या मुलांसाठी अंगणवाडी केंद्रासोबतच पाळणाघर सुरू करण्यात येणार आहे. यासोबतच पाळणा से‍विका, मदतनीस आणि निर्भया समुपदेशन केंद्रावरील समन्वयकाचे मानधन वाढविण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे," असे आश्वासनही आदिती तटकरे यांनी दिले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

सरकारी व्यवस्थेतील उणीवांचा लाभ घेत जन्म-मृत्यू नोंदणीची प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हैदोसावर आता अंकुश बसणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. १२ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन करून, विलंबाने करावयाच्या जन्म-मृत्यू नोंदीबाबतच्या कार्यपध्दतीनिश्चित केल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आजपासूनच महाराष्ट्रात नवीन बदल लागू होतील, अशी घोषणा केली...

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

होळी म्हणजे रंगांचा उत्सव. एका पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नी जाळू शकणार नाही असा वर मिळाला होता. हिरण्यकशपूने होलिकेला सांगितले की प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीवर बसावेस म्हणजे प्रल्हाद जळून मरेल आणि होलिका मात्र जिवंत राहील. हिरण्यकशपूचा सल्ला तिने ऐकला. परंतू प्रल्हादाने नारायणाचे नामस्मरण केल्याने होलिका जळून गेली आणि प्रल्हाद जिवंत राहिला या आनंदाप्रीत्यर्थ दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली होलिकादहन केलं जाते. तसेच यावेळी दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा अशी प्रार्थना ..

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

(Tamil Nadu drops official Rupee Symbol from State Budget) तामिळनाडूमधील एमके स्टॅलिन यांचे सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भाषेच्या मुद्द्यावर तणावाचे वातावरण आहे. यात आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (M K Stalin) यांच्या निर्णयामुळे हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. तामिळनाडू सरकारने राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये रुपयाच्या चिन्हाऐवजी (₹) तमिळ भाषेतील रुबई मधील पहिले अक्षर ‘रु’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे...