वक्फ विधेयकात १४ सुधारणांना जेपीसीची मंजुरी!

बहुमताअभावी विरोधी पक्षांच्या सुधारणा फेटाळल्या

    27-Jan-2025
Total Views |

WAQF
 
नवी दिल्ली : (Waqf Amendment Bill) संसदेत वक्फ सुधारणा विधेयक नवीन स्वरूपात मांडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याविषयी स्थापन संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) सोमवार दि. २७ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) सदस्यांच्या सुधारणा बहुमतामने स्वीकारण्याता आल्या असून विरोधी पक्षांच्या सुधारणा बहुमत नसल्याने फेटाळण्यात आल्या आहेत.
 
जेपीसीचे अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ खासदार जगदंबिका पाल यांनी त्याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, ४४ सुधारणांवर त्यातील कलमांनुसार सखोल चर्चा करण्यात आली आहे. जवळपास सहा महिन्यांच्या चर्चेनंतर समितीने सर्व सदस्यांकडून सुधारणा मागवल्या होत्या. सोमवारची बैठक ही अखेरची बैठक होती. सादर करण्यात आलेल्या ४४ सुधारणांमध्ये विरोधी पक्षांच्या सदस्यांच्याही सुधारणांचाही समावेश होता. बहुमताच्या आधारे जेपीसीने १४ सुधारणा स्वीकारल्या आहेत. विरोधी पक्षांनी सुचवलेल्या सुधारणादेखील बैठकीत मांडण्यात आल्या होत्या. मात्र, त्या सुधारणांच्या समर्थनार्थ १० आणि विरोधात १६ मते होती. परिणामी बहुमत नसल्याने त्यांच्या सुधारणा फेटाळ्यात आल्याचे पाल यांनी यावेळी नमूद केले आहे.
 
जेपीसीची पुढील बैठक २९ जानेवारी २०२५ रोजी होईल. या बैठकीत विद्यमान सुधारणांसह विधेयकाचा मसुदा अहवाल समिती सदस्यांना सादर केला जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधेयकाचा हा मसुदा अहवाल ५०० पेक्षा जास्त पानांचा आहे. तथापि, जर समितीमध्ये उपस्थित असलेल्या विरोधी खासदारांनी यावर आपली असहमती नोंदविली तर त्यातील काही भागदेखील मसुदा अहवालात समाविष्ट केला जाणार आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास ३१ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. त्यामुळे यादरम्यान जेपीसी आपला अहवाल लोकसभा अध्यक्षांना सादर केला जाऊ शकतो.
 
दरम्यान, जेपीसीच्या निर्णयास विरोधी पक्षांच्या खासदारांनी विरोध केला. सविस्तर चर्चा न झाल्याचा आरोप त्यांच्यातर्फे करण्यात आला आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना नाना पटोले यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर

अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना नाना पटोले यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर

Nana Patole उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी १० मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर खुर्च्यांच्या अदलाबदलीवरून चर्चाही झाल्या. त्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. आमच्याकडे या आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, असे नाना पटोले म्हणाले. यामुळे आता राज्याच्या राजकीय परिस्थितीत उलथापालथ ..

जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

सरकारी व्यवस्थेतील उणीवांचा लाभ घेत जन्म-मृत्यू नोंदणीची प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हैदोसावर आता अंकुश बसणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. १२ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन करून, विलंबाने करावयाच्या जन्म-मृत्यू नोंदीबाबतच्या कार्यपध्दतीनिश्चित केल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आजपासूनच महाराष्ट्रात नवीन बदल लागू होतील, अशी घोषणा केली...

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

होळी म्हणजे रंगांचा उत्सव. एका पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नी जाळू शकणार नाही असा वर मिळाला होता. हिरण्यकशपूने होलिकेला सांगितले की प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीवर बसावेस म्हणजे प्रल्हाद जळून मरेल आणि होलिका मात्र जिवंत राहील. हिरण्यकशपूचा सल्ला तिने ऐकला. परंतू प्रल्हादाने नारायणाचे नामस्मरण केल्याने होलिका जळून गेली आणि प्रल्हाद जिवंत राहिला या आनंदाप्रीत्यर्थ दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली होलिकादहन केलं जाते. तसेच यावेळी दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा अशी प्रार्थना ..