महाराष्ट्र राज्य सहकारी बँक स्वयंपुनर्विकास प्रकल्पांसाठी मुंबई बँकेला देणार दीड हजार कोटी

    25-Jan-2025
Total Views |
Mumbai Bank


मुंबई
: मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे ( Mumbai Bank ) स्वयंपुनर्विकासासाठी १६०० गृहनिर्माण संस्थांनी संपर्क साधला असून आतापर्यंत १४ प्रकल्पांना २१८ कोटी रुपये दिले आहेत. त्यापैकी ४ प्रकल्प पूर्ण होऊन त्यांना घराचा ताबा देखील देण्यात आला आहे. बँकेला आर्थिक मर्यादा असल्याने मुंबई बँकेला पतपुरवठा करावा, अशी विनंती दरेकर यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला केली आहे.

स्वयंपुनर्विकासातील अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या मुख्य कार्यालयात मुंबई बँकेने आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई जिल्हा सहकारी हैसिंग फेडरेशन व मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस राज्य बँकेचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिध्दार्थ टी.कांबळे, संचालक विठ्ठलराव भोसले, नितीन बनकर, हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर वैश्यंपायन, वित्त विभागाचे सहसचिव डॉ.माधव वीर, म्हाडाच्या सहमुख्य कार्यकारी अधिकारी वंदना सुर्यवंशी, म्हाडाचे निवासी कार्यकारी अभियंता माधव सानप, गृहनिर्माण विभागाचे अवर सचिव दीपक शेलार, गृहनिर्माण विभागाचे कक्ष अधिकारी नितीन फिरंगे, मुंबई बँकेचे कार्यकारी संचालक श्री.डी.एस.कदम, मुख्य सरव्यवस्थापक श्री.एस.सी.सुर्वे, बँकेचे प्रकल्प सल्लागार हर्षल मोरे आणि स्वयंपुनर्विकास पूर्ण झालेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार दरेकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, बँकेने सुरु केलेली स्वयंपुनर्विकास योजना ही सर्वसामान्य मुंबईकरांसाठी घराचे स्वप्न पूर्ण करणारी योजना आहे. मुंबई बँकेने राबवलेला नंददीप सहकारी गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास प्रकल्प पूर्ण होऊन फ्लॅटधारकांना किल्ल्या हातात देताना त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रु खूप काही सांगून जातात. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आतापर्यंत या योजनेला सर्वबाबतीत मदत केली आहे.

दरेकर असेही म्हणाले की, मुंबई बँकेकडे १६०० गृहनिर्माण संस्थांनी संपर्क साधला असून आतापर्यंत २१८ कोटी रुपये या प्रकल्पांसाठी दिले आहेत. बँकेला आर्थिक मर्यादा असल्याने राज्य सहकारी बँकेने मुंबई बँकेला पतपुरवठा करावा.
मुंबई बँकेकडून मुंबईतील सायन प्रतिक्षानगर येथे प्रशिक्षण व मार्गदर्शनासाठी सर्व सुविधायुक्त सहकार संकुलाची उभारणी केली जात आहे. हे संकुल सहकार क्षेत्रातील सर्व संस्थांसाठी, कार्यकर्त्यांसाठी उपयोगी ठरणार आहे. त्यासाठी शासनाने अनुदान द्यावे, अशीही विनंती दरेकर यांनी त्यांच्या भाषणात केली.

यावेळी बोलताना राज्य सहकारी बँकेचे विद्याधर अनास्कर यांनी आश्वासन दिले की, राज्य सहकारी बँक नेहमीच अशा उपक्रमांना मदत करण्याची भूमिका घेत असते. राज्य बँकेकडून गृहनिर्माणासाठी असलेल्या निधीतून १५०० कोटी रुपये आम्ही निश्चितपणे देऊ. दोन-तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी कन्सोर्शियम करण्याची प्रक्रिया करावी.

बैठकीत अध्यक्षीय भाषण करताना सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले की, प्रवीण दरेकर हे नाव सहकार क्षेत्रातील मोठे नाव आहे. त्यांच्यामुळे ‍मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मला जिल्हा बँकेत येण्याची संधी मिळाली आहे. प्रवीण दरेकर यांच्या प्रेरणेतून तयार झालेल्या स्वयंपुनर्विकास योजनेची माहिती घेतल्यानंतर साडेतीनशे चौरस फुटाची घरे असणाऱ्यांना ९०० ते १४०० स्क्वेअर फुटाची घरे मिळाल्याचे ऐकून आश्चर्य वाटले. खरोखरच ही योजना अतिशय चांगली योजना आहे. ज्या सोसायट्यांचा पुनर्विकास पूर्ण झाला त्यांचे पदाधिकारीही या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित आहेत. हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकारीता वर्ष आहे. मुंबई बँकेने किमान एक हजार संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाचे उद्दिष्ट समोर ठेवावे, गतीने ते पूर्ण करु, सरकार या योजनेच्या पाठीशी निश्चित ठामपणे उभे आहे. मुख्यमंत्री महोदय देखील या योजनेबाबत सकारात्मक आहेत. मला विश्वास आहे की, एक हजार प्रकल्प पूर्ण केले तर प्रवीण दरेकर यांच्या प्रेरणेतून तयार झालेली ही योजना संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशात नावारुपाला येईल. मुंबई बँकेकडून उभारण्यात येणाऱ्या सहकार संकुलासाठी सरकार 50 कोटी रुपयांची तरतूद करील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

अग्रलेख
जरुर वाचा
जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

सरकारी व्यवस्थेतील उणीवांचा लाभ घेत जन्म-मृत्यू नोंदणीची प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हैदोसावर आता अंकुश बसणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. १२ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन करून, विलंबाने करावयाच्या जन्म-मृत्यू नोंदीबाबतच्या कार्यपध्दतीनिश्चित केल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आजपासूनच महाराष्ट्रात नवीन बदल लागू होतील, अशी घोषणा केली...

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

होळी म्हणजे रंगांचा उत्सव. एका पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नी जाळू शकणार नाही असा वर मिळाला होता. हिरण्यकशपूने होलिकेला सांगितले की प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीवर बसावेस म्हणजे प्रल्हाद जळून मरेल आणि होलिका मात्र जिवंत राहील. हिरण्यकशपूचा सल्ला तिने ऐकला. परंतू प्रल्हादाने नारायणाचे नामस्मरण केल्याने होलिका जळून गेली आणि प्रल्हाद जिवंत राहिला या आनंदाप्रीत्यर्थ दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली होलिकादहन केलं जाते. तसेच यावेळी दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा अशी प्रार्थना ..

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

(Tamil Nadu drops official Rupee Symbol from State Budget) तामिळनाडूमधील एमके स्टॅलिन यांचे सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भाषेच्या मुद्द्यावर तणावाचे वातावरण आहे. यात आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (M K Stalin) यांच्या निर्णयामुळे हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. तामिळनाडू सरकारने राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये रुपयाच्या चिन्हाऐवजी (₹) तमिळ भाषेतील रुबई मधील पहिले अक्षर ‘रु’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे...