मध्यप्रदेशमध्ये दारूबंदी! 'या' धार्मीक स्थळांवर मद्यविक्रीवर बंदी

    24-Jan-2025
Total Views | 130

mop1

भोपाळ : मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळाने रोजी मध्य प्रदेशच्या एकूण १७ धार्मीक स्थळांवर मद्यविक्री करण्यास बंदी घातली आहे. माध्यमांशी संवाद साधत या संदर्भात माहिती देताना यादव म्हणाले की नवीन उत्पादन शुल्क धोरणाची अंमलबजावणी थोड्याच दिवसांमध्ये केली जाईल. यानंतर एकूण १७ धार्मीक स्थाळांवर मद्यविक्री करण्यावर बंदी घातली जाईल. गुरूवार दिनांक २३ जानेवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

धार्मीक स्थळांचे पावित्र्य राखले जावे यासाठी सदर परिसरात मद्य विक्रीवर बंदी आणली जावी असा प्रस्ताव काही संतांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या समोर मांडला होता. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या या प्रस्तावावर अंमलबजावणी झाल्याचे बघायला मिळतं आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार - दतिया, पन्ना, मंडला, मुलताई, मंदसौर, मैहर, ओंकारेश्वर, महेश्वर, मंडलेश्वर, ओरछा, चित्रकूट, अमरकंटक, साल्कनपूर, बर्मन कला, लिंगा, कुंडलपूर, बंदकपूर आणि बर्मनखुर्द या ठिकाणी मद्य विक्रीवर बंदी आणण्यात आली आहे. त्याच बरोबर इथली मद्यविक्रीची दुकानं दुसरीकडे स्थलांतरित होणार नसून, पूर्णपणे बंद केली जाणार असल्यची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्याच बरोबर यादव म्हणाले की मद्यविक्रीवर बंदी घालणं ही केवळ पहिली पायरी आहे. संपूर्ण राज्यामध्ये मद्यपान बंद झाले पाहिजे असं सुद्धा ते म्हणाले.

माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की "धार्मीक स्थळांवर मद्यविक्रीवर बंदी आणण्याचा मोठा निर्णय आम्ही घेत आहोत. दारूच्या व्यसनामुळे कुटूंबातील सदस्यांना अनेक यातना भोगाव्या लागतात. या देशातील युवा, या देशाचं भविष्य आहेत. त्यांचं आयुष्य दारूच्या व्यसनापायी खराब होऊ नये हीच आमची इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही सुशासन आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. या देशातील स्त्रीया, शेतकरी, लहान मुलं, या सगळ्यांनी चांगलं आयुष्य जगावं हीच आमची इच्छा आहे. भगवान श्रीकृष्ण आणि प्रभूश्रीराम यांनी मध्यप्रदेशमध्ये ज्या ज्या ठिकाणी पाऊल ठेवलं आहे, त्या त्या ठिकाणी मद्यविक्री केली जाणार आहे."

 
अग्रलेख
जरुर वाचा
२१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकर; चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित

२१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकर; चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'या' नाटकात दिसणार मुख्य भूमिकेत!

एखादा कलाकार कितीही मोठा झाला, कितीही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले, मसालापटांपासून चरित्रपटांपर्यंत आभाळाएवढ्या उंचीच्या व्यक्तिरेखा साकारल्या तरी रंगभूमीची ओढ कधीच संपत नाही. कोणताही हाडाचा कलाकार ठराविक वेळेनंतर पुन्हा तो रंगभूमीकडे वळतो, इथे होणाऱ्या तिसऱ्या घंटेसोबत व्यक्तिरेखेत शिरतो, प्रयोगांमागून प्रयोग करत त्यातच रमतो आणि जिवंत कला पाहण्याचा अनुभव रसिकांना देताना स्वत:लाही धन्य मानू लागतो. चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकरही याला अपवाद नाहीत. मराठीपासून हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ..

सर्वसमावेशक विकासासाठी पतपेढी चळवळ आवश्यकच : विद्याधर अनास्कर

सर्वसमावेशक विकासासाठी पतपेढी चळवळ आवश्यकच : विद्याधर अनास्कर

2025 हे वर्ष संयुक्त राष्ट्राने ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. याच सहकार क्षेत्राचे जाळे महाराष्ट्रात खूप खोलवर रुजले आहे. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे सहकारी वित्तीय संस्था आणि या वित्तीय संस्थांमधील महत्त्वाचा भाग म्हणजे, सहकारी पतसंस्था म्हणजेच सहकारी पतपेढी. सर्वसामान्य माणसांच्या जवळच्या आणि त्यांच्या अर्थकारणातही या पतसंस्थांना आजही जिव्हाळ्याचे स्थान आहे. पण, आज याच पतसंस्थांची चळवळ ही काही गैरप्रकारांमुळे संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. त्यानिमित्ताने पतसंस्थांच्या अर्थकारणाचा, ..