सिंधुदुर्गातून व्हेलचे रेस्क्यू; जिल्ह्यात पहिल्यांदाच वाहून आला 'या' प्रजातीचा व्हेल

    23-Jan-2025
Total Views | 395
whale released from sindhudurg




मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
सिंधुदुर्गातील तळाशील खाडीत गुरुवार दि. २३ जानेवारी रोजी वाहून आलेल्या सात फुटांच्या 'ड्वार्फ स्पर्म व्हेल' या सागरी सस्तन प्राण्याला सुखरुप समुद्रात सोडण्यात आले (whale released from sindhudurg). वन विभागाच्या 'कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण'च्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने खाडीत अडकलेल्या या व्हेलला खोल समुद्रात जाऊन सोडले. (whale released from sindhudurg)
 
 
तळाशील खाडीतील जुवे पाणखोल बेटाजवळील उथळ पाण्यात गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सात फुटांचा आणि ३०० किलो वजनाचा व्हेल वाहून आल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. स्थानिक मच्छिमारांनी या व्हेलच्या शेपटीला दोरी बांधून त्याला पाण्यात सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुन्हा एकदा व्हेल उथळ पाण्यात वाहून आला. त्यामुळे स्थानिकांनी याची माहिती वन विभागाला दिली. 'कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण'च्या कर्मचाऱ्यांनी 'कांदळवन प्रतिष्ठान'च्या तज्ज्ञांसमेवत घटनास्थळी धाव घेतली. मुंबईचे तज्ज्ञ पशुवैद्यक डाॅ. दिनेश विन्हेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पशुवैद्यक डाॅ. लांडगे यांनी व्हेलवर प्रथमोपचार केले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी मच्छीमारांच्या मदतीने दोन बोटींच्या मध्ये ग्रीन शेड जाळी बांधून त्यावर लगतपणे व्हेलला घेतले. साधरण दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास खोल समुद्रात जाऊन कर्मचाऱ्यांनी व्हेलला सोडल्याची माहिती सिंधुदुर्गचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी (कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण) समीर शिंदे यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली.
 
 
वाहून आलेला व्हेल हा 'ड्वार्फ स्पर्म व्हेल' या प्रजातीचा निमवयस्क व्हेल असल्याची माहिती मिहीर सुळे यांनी दिली आहे. या प्रजातीचा व्हेल प्रथमच सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर वाहून आल्याचे त्यांनी सांगितले. ही प्रजात किनाऱ्याजवळ अधिवास करत नसून खोल समुद्रात अधिवास करत असल्याची माहिती त्यांनी दिली. व्हेल बचावाचे हे काम वनपरिक्षेत्र अधिकारी समीर शिंदे यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत वनरक्षक दत्ता मुखाडे, वनरक्षक संजीव जाधव, 'कांदळवन प्रतिष्ठान'चे केदार पालव, मयुर पानसरे यांनी स्थानिक गावकरी विवेक रेवणकर आणि विवेक गावकर यांच्या मदतीने केले.
अग्रलेख
जरुर वाचा
२१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकर; चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित

२१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकर; चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'या' नाटकात दिसणार मुख्य भूमिकेत!

एखादा कलाकार कितीही मोठा झाला, कितीही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले, मसालापटांपासून चरित्रपटांपर्यंत आभाळाएवढ्या उंचीच्या व्यक्तिरेखा साकारल्या तरी रंगभूमीची ओढ कधीच संपत नाही. कोणताही हाडाचा कलाकार ठराविक वेळेनंतर पुन्हा तो रंगभूमीकडे वळतो, इथे होणाऱ्या तिसऱ्या घंटेसोबत व्यक्तिरेखेत शिरतो, प्रयोगांमागून प्रयोग करत त्यातच रमतो आणि जिवंत कला पाहण्याचा अनुभव रसिकांना देताना स्वत:लाही धन्य मानू लागतो. चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकरही याला अपवाद नाहीत. मराठीपासून हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ..

सर्वसमावेशक विकासासाठी पतपेढी चळवळ आवश्यकच : विद्याधर अनास्कर

सर्वसमावेशक विकासासाठी पतपेढी चळवळ आवश्यकच : विद्याधर अनास्कर

2025 हे वर्ष संयुक्त राष्ट्राने ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. याच सहकार क्षेत्राचे जाळे महाराष्ट्रात खूप खोलवर रुजले आहे. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे सहकारी वित्तीय संस्था आणि या वित्तीय संस्थांमधील महत्त्वाचा भाग म्हणजे, सहकारी पतसंस्था म्हणजेच सहकारी पतपेढी. सर्वसामान्य माणसांच्या जवळच्या आणि त्यांच्या अर्थकारणातही या पतसंस्थांना आजही जिव्हाळ्याचे स्थान आहे. पण, आज याच पतसंस्थांची चळवळ ही काही गैरप्रकारांमुळे संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. त्यानिमित्ताने पतसंस्थांच्या अर्थकारणाचा, ..