गुंतवणूकदारांनो, पैसे तयार ठेवा, फूड डिलिव्हरी कंपनीचा आयपीओ बाजारात येणार

    25-Sep-2024
Total Views |
swiggy-to-launch-ipo-in-november-say-reports


मुंबई :      सध्या शेअर बाजारात प्रारंभिक सार्वजनिक ऑफर(आयपीओ) प्रचंड प्रमाणात पाहायला मिळत आहे. सद्यस्थितीस अनेक कंपन्यांचे आयपीओज बाजारात दाखल झाले असून गुंतवणूकदारांकडून त्यास मोठा प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. दरम्यान, ऑनलाइन फूड ऑर्डरिंग आणि डिलिव्हरी कंपनी असलेल्या स्विगीने आयपीओ लाँच करण्याकरिता सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया(SEBI)कडे कागदपत्रे सादर केली आहेत.

स्विगीला नोव्हेंबरमध्ये प्रारंभिक सार्वजनिक ऑफर(आयपीओ) लाँच करण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया(SEBI)कडून मंजुरी मिळाली आहे. गुंतवणूकदारांना नोव्हेंबरमध्ये आयपीओकरिता अर्ज करता येणार आहे. फूड डिलिव्हरी कंपनीने दि. ३० एप्रिल रोजी प्री-फाइलिंगद्वारे ऑफर दस्तऐवज सेबीकडे सादर केला होता. त्यानंतर आता कंपनीस सेबीकडून मान्यता देण्यात आली आहे.

दरम्यान, २००४ मध्ये स्थापित स्विगीचे मुख्यालय बंगलोर येथे असून देशभरातील ५८० हून अधिक शहरांमध्ये फूड डिलिव्हरी सेवा कार्यरत आहे. स्विगी आयपीओच्या माध्यमातून ५ हजार कोटींच्या नवीन इश्यूसह ११ हजार कोटी रुपये बाजार भांडवल उभारण्याचा विचार करत आहे. आयपीओ बाजारात दाखल होण्यापूर्वी अपडेट केलेला रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस मसुदा(UDRHP) गुंतवणूकदारांसमोर २१ दिवसांकरिता ठेवावा लागतो. त्यानंतरच एखादी कंपनी किंवा फर्म आयपीओ बाजारात आणू शकते.