मुंबई : (Devendra Fadnavis) श्रीगणेश विघ्नहर्ता आहेत. त्यांनी सर्वांना सुख-समाधान द्यावे, अशी प्रार्थना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला दिलेल्या भेटीवेळी केली.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर प्रमुख मार्गदर्शक असलेल्या सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रीगणेशाची मनोभावे पूजाअर्चा केली. त्यानंतर आमदार दरेकर आणि मंडळाचे आयोजक प्रकाश दरेकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि श्री गणेशाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भाजपा आमदार भाई गिरकर, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे, रिपाईचे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, भाजपा उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, मंडळाचे अध्यक्ष दिलीप राठोड, उपाध्यक्ष संजय दळवी, सचिव सम्राट कदम, सहसचिव महेश नाईक, खजिनदार अतुल नवले, आदित्य दरेकर, रविंद्र रावराणे उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, दरवर्षी या ठिकाणी श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी मी येत असतो. यावर्षी विसर्जनाच्या दिवशी मला येण्याची संधी मिळाली. मला आनंद आहे कि मी विसर्जनापूर्वी येथे पोचलो आणि श्रीगणेशाचे दर्शन घेता आले. श्री गणेश विघ्नहर्ता आहेत. त्यांच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो कि, त्यांनी आपल्या सर्वांच्या जीवनातील विघ्न दूर करावेत, सर्वांना सुख-समाधान, आरोग्य-ऐश्वर्य द्यावे. सर्वांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात आणि आपल्या सर्वांना आशीर्वाद देऊन आपल्या हातून चांगली कार्य ही श्रीगणेशाने करून घ्यावीत, अशी प्रार्थना करतो.
गणरायाचे दर्शन घेताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर, भाजपा मुंबई उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, भाजपा आमदार विजय (भाई) गिरकर, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे, रिपाई जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड भाजपा उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष गणेश खणकर छायाचित्रात दिसत आहेत.